- दा. कृ. सोमण
पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी जुनी म्हण आहे; पण ते काही खरे नाही. दुष्काळ नसतानाही तेरावा महिना येऊ शकतो, तसा तो यावर्षी आला आहे. यावर्षी रविवार, १७ मेपासून सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत ज्येष्ठ अधिकमास आला आहे. त्यामुळे वटपौर्णिमा, गणेश चतुर्थी, विजया दशमी, दीपावली इत्यादी सर्व सण २० दिवस उशिरा येत आहेत. यंदा पर्जन्यराजाचे आगमनही वेळेवर होणार आहे, असा वेधशाळेचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे यावर्षीचा ज्येष्ठ अधिकमास सुखाचा ठरणार आहे.
अधिकमासास पुरुषोत्तममास, धोंड्याचा महिना, मलमास असेही म्हणतात. प्राचीनकाळी शास्त्रकारांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आरोग्य’ हे ओळखले होते. माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य जर चांगले असेल तर जीवन सुखी व आनंदी होऊ शकते, हे जाणले होते. शरीराचे आरोग्य प्रामुख्याने आहारावर अवलंबून असते. माणसाने जर ऋतूप्रमाणे आहार घेतला तर शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्यामुळे ठराविक सण ठराविक ऋतूत येत असतात. तीस तिथींचा एक चांद्रमास होतो व ३६० तिथींचे (म्हणजेच बारा चांद्रमासांचे) एक चांद्रवर्ष होते.
अधिकमासात काय करावे?
अधिकमासात संपूर्ण दिवस उपवास, किंवा एक वेळ भोजन करावे. अधिकमासात जावयाला ३३ अनारशांचे दान देण्याची प्रथा सुरू झाली असावी.
३३ अंक म्हणजे तीन वर्षांत वाढल्या गेलेल्या तेहतीस तिथी मानल्या जातात. ‘केल्यावाचून गती नाही’ अशी कर्मे अधिकमासात करावयास
हरकत नाही.
भारतीय संस्कृतीत दानाचे विशेष महत्त्व आहे. दान म्हणजे ‘डोनेशन’ नव्हे. दान कोणी दिले आणि काय दिले ते गुप्त ठेवायचे असते. अधिकमासाच्या निमित्ताने समाजातील गरजू गरीब लोकांना, तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना मदत मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे.
संस्कृतमध्ये दानासंबंधी
सुंदर सुभाषित आहे.
गौरवं प्राप्यते दानात्,
न तु वित्तस्य संचयात्।
स्थितिरुच्चै: पयोदानां, पयोधीनामध: स्थिति:॥
दान केल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. धन साठविल्याने नव्हे. जसे (पाणी देणाऱ्या) ढगाचे स्थान आकाशात उंचावर असते; परंतु (पाणी साठविणाऱ्या) समुद्राचे स्थान खाली असते.
यापुढील अधिकमास
१६ मार्च ते १३ एप्रिल २०२९ : चैत्र
१९ ऑगस्ट ते १६ सप्टें. २०३१ : भाद्रपद
१७ जून ते १५ जुलै २०३४ : आषाढ
१६ मे ते १३ जून २०३७ : ज्येष्ठ
१९ सप्टें. ते १७ ऑक्टो. २०३९ : आश्विन
१८ जुलै ते १५ ऑगस्ट २०४२ : श्रावण
१७ मे ते १५ जून २०४५ : ज्येष्ठ
१५ मार्च ते १३ एप्रिल २०४८ : चैत्र
१८ ऑगस्ट ते १६ सप्टें. २०५० : भाद्रपद
Web Summary : The extra month, starting May 17th, promises prosperity. Festivals like Vat Purnima are delayed. Auspicious for health and giving, it encourages donations to the needy. The monsoon's timely arrival adds to the joy.
Web Summary : 17 मई से शुरू हो रहा अतिरिक्त महीना समृद्धि का वादा करता है। वट पूर्णिमा जैसे त्योहारों में देरी होगी। स्वास्थ्य और दान के लिए शुभ, यह जरूरतमंदों को दान करने के लिए प्रोत्साहित करता है। मानसून का समय पर आना खुशी को बढ़ाता है।