जगाची चिंता वाढवणाऱ्या एका भयानक विषाणूच्या फैलावाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. कांगो आणि युगांडा देशामध्ये पसरत असलेल्या इबोला विषाणूच्या संसर्गाला जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केले आहे. बंडिबुग्यो विषाणूमुळे फैलावत असलेला हा संसर्गजन्य आजार पँडॅमिक घोषित करण्याइतपत अद्याप धोकादायक बनलेला नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपर्यंत कांगोच्या इटुरी प्रांतामधील बुनिया, रवामपारा आणि मोंगब्वालू भागात ८० संशयित मृत्यू आणि ८ रुग्ण आणि २४६ संशयित रुग्ण सापडले आहेत. इबोला हा एका अत्यंत धोकादायक विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. याचा संसर्ग होण्याचं प्रमाण फार दुर्मीळ आहे. मात्र अनेकदा हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, उलटी, घाम किंवा विर्य अशा द्रवरूप पदार्थाच्या संपर्कात आल्याने एकापासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. इबोला विषाणूवर अद्याप कुठलाही इलाज सापडलेला नाही. मात्र त्यावरील लस उपलब्ध आहे.
Web Summary : Ebola is spreading in Congo and Uganda. WHO declared a global health emergency. The Bundibugyo virus spreads through bodily fluids. Treatment is limited, but a vaccine exists. The disease is highly dangerous and often fatal.
Web Summary : कांगो और युगांडा में इबोला फैल रहा है। WHO ने वैश्विक स्वास्थ्य आपातकाल घोषित किया। बुंडिबुग्यो वायरस शारीरिक तरल पदार्थों से फैलता है। उपचार सीमित है, लेकिन एक टीका मौजूद है। यह रोग अत्यधिक खतरनाक और अक्सर घातक होता है।