शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 06:21 IST

कोरोना, जागतिक संघर्ष, पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तींचे दशक ठरले आहे.

हेग : कोरोना, जागतिक संघर्ष, पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट यामुळे जगासाठी हे दशक आपत्तींचे दशक ठरले आहे. या परिस्थितीत लवकर बदल केला नाही तर गेल्या अनेक दशकांतील प्रगतीवर विपरित परिणाम होऊ शकतो व मोठी लोकसंख्या पुन्हा गरिबीच्या खाईत ढकलली जाऊ शकते, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नेदरलँडमधील हेग येथे दिला. 

तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारत ही अनेक संधींची भूमी आहे. आपल्या देशात अभूतपूर्व परिवर्तन सुरू आहे. भारताच्या आकांक्षा आता केवळ देशाच्या सीमांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. देशाकडे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप नेटवर्क आहे. आपल्या स्टार्टअप्स एआय, संरक्षण व अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. 

मोदी यांनी सांगितले की, देशात संशोधन आणि नवोन्मेषाची संस्कृती अधिक विस्तारत आहे. तसेच लोकशाही मजबूत होत असून, विविध राज्यांतील निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी वाढत आहे. (वृत्तसंस्था)

‘झालमुडी हेगमध्येही पोहोचला आहे का?’ 
झालमुडी हा खाद्यपदार्थ हेगमध्येही पोहोचला आहे का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेदरलँडमधील भारतीयांना विचारून विरोधी पक्षांना टोला लगावला. 
मोदी म्हणाले की, अनेक संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाल्या, पण भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. 
पंतप्रधान मोदी शुक्रवारी नेदरलँड्समध्ये दाखल झाले. त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यावर भर दिला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Decade of disasters, poverty trap: PM Modi warns the world.

Web Summary : PM Modi warned in The Hague that the world faces a decade of disasters due to global conflicts and energy crises, potentially reversing progress and pushing populations into poverty. He highlighted India's opportunities, startup growth, and expanding innovation culture, emphasizing its vibrant, enduring culture.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी