प्रयागराजमधील नैनी बाजार येथील 'संजीवनी क्रॉकरी'च्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीने रौद्ररूप धारण केलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका आईने मोठं धाडस दाखवत आपल्या तीन मुलांचा जीव वाचवला आहे. मात्र या बचावकार्यादरम्यान आई स्वतः इतकी गंभीर भाजली की रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अर्चना असं या आईचं नाव असून तिने दाखवलेल्या धाडसाची चर्चा होत आहे.
आग लागली त्यावेळचा एक अत्यंत भावुक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, धूर आणि आगीच्या ज्वाळा यामध्ये अर्चना बऱ्याच वेळ संघर्ष करत होती. अर्चनाने सर्वात आधी खिडकीत लटकून आपल्या अवघ्या एक वर्षाच्या निष्पाप बाळाला खाली उभ्या असलेल्या शेजाऱ्यांच्या दिशेने फेकलं, मुलाला लोकांनी नीट झेललं.
मुलींचा असा वाचवला जीव
यानंतरही हिंमत न हारता आईने एका छतावरून दुसऱ्या छतावर लोखंडी शिडी लावली. अर्चनाने आपल्या १३ आणि १० वर्षांच्या दोन मुलींना त्या अरुंद शिडीच्या साहाय्याने शेजाऱ्यांच्या छतावर सुरक्षितपणे पाठवलं. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन गल्ली अत्यंत अरुंद असल्यामुळे मदत आणि बचावकार्यात मोठे अडथळे आले. शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग इतक्या वेगाने पसरली की घराबाहेर पडण्याचा खालचा एकमेव रस्ता पूर्णपणे बंद झाला आणि कुटुंब वरच्या मजल्यावर अडकलं.
अर्चना आग आणि धुराच्या विळख्यात अडकली
गल्ली अरुंद असल्यामुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचायला वेळ लागला. मात्र, नंतर अग्निशामक दलाच्या १२ गाड्यांनी अथक परिश्रम करून या आगेवर नियंत्रण मिळवलं. मुलांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर अर्चना आग आणि धुराच्या विळख्यात पूर्णपणे अडकली. बचाव पथक त्यांना बाहेर काढणार तोपर्यंत ती गंभीररित्या भाजली होती.
जीवाची पर्वा न करता ३ मुलांना वाचवलं
या भयानक प्रसंगात घरात असलेली अर्चनाची भावजय सरिताने जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. उंचीवरून पडल्यामुळे पायाला फ्रॅक्चर झालं आहे. अर्चनाची १३ वर्षांची मोठी मुलगीही आगीत भाजली असून तिला रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) मध्ये दाखल करण्यात आलं आहे. अर्चनाना आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या ३ मुलांना आगीतून वाचवलं.
Web Summary : In Prayagraj, a mother, Archana, tragically died saving her three children from a fire. She rescued them by throwing her baby to safety and guiding her daughters across a roof. Critically burned, she succumbed to her injuries in the hospital.
Web Summary : प्रयागराज में, एक माँ, अर्चना, ने आग से अपने तीन बच्चों को बचाने के लिए दुखद रूप से अपनी जान गंवा दी। उसने अपने बच्चे को सुरक्षित फेंककर और अपनी बेटियों को छत पर मार्गदर्शन करके बचाया। गंभीर रूप से जलने के कारण अस्पताल में उसकी मृत्यु हो गई।