Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 20:41 IST

आजकाल ब्लूटूथ इयरबड्स आणि वायरलेस हेडफोन्स लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. ऑफिसच्या कॉल्सपासून ते जिम, प्रवास आणि अगदी झोपताना पॉडकास्ट ऐकण्यापर्यंत, लोक तासनतास यांचा वापर करतात.

आजकाल ब्लूटूथ इयरबड्स आणि वायरलेस हेडफोन्स लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. ऑफिसच्या कॉल्सपासून ते जिम, प्रवास आणि अगदी झोपताना पॉडकास्ट ऐकण्यापर्यंत, लोक तासनतास यांचा वापर करतात. परंतु, यांच्या वाढत्या वापरासोबतच एक प्रश्नही वेगाने चर्चेत आला आहे, तो म्हणजे—दीर्घकाळ ब्लूटूथ इयरबड्स वापरल्याने ब्रेन कॅन्सरचा धोका वाढू शकतो का?

ब्लूटूथ टेक्नॉलॉजी कसं काम करते?

ब्लूटूथ टेक्नॉलॉजी हे रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजेच 'आरएफ रेडिएशन'च्या (RF Radiation) माध्यमातून काम करतं. याच कारणामुळे अनेक लोक घाबरतात, कारण 'रेडिएशन' हा शब्द ऐकताच कॅन्सरसारख्या आजारांचे विचार मनात येऊ लागतात. मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ब्लूटूथ डिव्हाइसमधून निघणारे रेडिएशन हे "नॉन-आयोनायझिंग रेडिएशन"च्या कॅटेगरीमध्ये येतं. हे एक्स-रेसारख्या धोकादायक 'आयोनायझिंग रेडिएशन'पेक्षा पूर्णपणे वेगळं असतं.

तासनतास वापरल्याने काय होतो परिणाम?

युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाचे बायोइंजिनिअरिंग प्रोफेसर एमेरिटस डॉ. केन फोस्टर यांच्या मते, ब्लूटूथ डिव्हाइसमधून निघणारे रेडिएशन हे फोनच्या तुलनेत खूपच कमी असतात. त्यांनी 'Health' या मॅगझिनशी बोलताना सांगितलं की, जर एखादी व्यक्ती तासनतास वायरलेस इयरबड्स वापरत असेल, तरीही त्याचे रेडिएशन एक्सपोजर हे फोन कानाला लावून बोलण्यापेक्षा कमीच मानलं जातं.

ब्लूटूथमुळे डीएनएचं नुकसान होतं का?

तज्ज्ञ सांगतात की, आयोनायझिंग रेडिएशन शरीरातील डीएनएला नुकसान पोहोचवू शकतात आणि कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. परंतु ब्लूटूथ डिव्हाइसेस नॉन-आयोनायझिंग रेडिएशनचा वापर करतात, ज्यामध्ये पेशींना (Cells) तशा प्रकारे नुकसान पोहोचवण्याइतकी ऊर्जा नसते. याच कारणामुळे आतापर्यंतच्या कोणत्याही संशोधनात ब्लूटूथ इयरबड्स आणि ब्रेन कॅन्सर यांच्यात थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

शास्त्रज्ञांचं हेही मत आहे की वायरलेस डिव्हाइसेस आणि आरएफ रेडिएशनवर अजून सखोल संशोधनाची गरज आहे. सध्या उपलब्ध असलेल्या अभ्यासांमध्ये असा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही, जो हे सिद्ध करेल की ब्लूटूथ इयरबड्स ब्रेन ट्यूमर किंवा कॅन्सरचं कारण बनतात.

वापरताना कोणती काळजी घ्यावी?

डॉ. केन फोस्टर यांचं म्हणणं आहे की, जर एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त काळजी घ्यायची असेल तर ते गरज नसताना इयरबड्स कानातून काढू शकतात किंवा वायर असलेल्या हेडफोन्सचा वापर करू शकते. पण त्यांच्या मते, लोकांनी जास्त काळजी अशा धोक्यांची केली पाहिजे ज्यामुळे नुकसान होऊ शकतं, जसं की खूप जास्त आवाजात दीर्घकाळ गाणी ऐकणं. तज्ज्ञांच्या मते, गरजेपेक्षा जास्त मोठ्या आवाजात इयरबड्स वापरल्याने ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच असा सल्ला दिला जातो की, हेडफोनचा वापर ६० ते ९० मिनिटांपर्यंतच मर्यादित ठेवावा. वापरताना मध्ये-मध्ये ब्रेक घ्या. आवाजाची पातळी ६० ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नये.

English
हिंदी सारांश
Web Title : Bluetooth earbuds and brain cancer: Expert advice and precautions.

Web Summary : Bluetooth earbuds use non-ionizing radiation, unlike X-rays, posing minimal cancer risk. Experts suggest limiting earbud use to 60-90 minutes with breaks and keeping volume below 80% to protect hearing.
टॅग्स : कर्करोगहेल्थ टिप्सआरोग्य