Sunil Narine Record : कॅरेबियन सुपर स्टार सुनील नरेन याने IPL करिअरमध्ये आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव येताच त्याच्या नावे खास 'द्विशतकी' विक्रमाची नोंद झाली. IPL मध्ये २०० सामने खेळणारा तो पहिला परदेशी क्रिकेटपटू ठरला आहे. २०१२ मध्ये KKR कडून पदार्पण करणारा नरेन मागील १६ वर्षे एकाच फ्रँचायझीसोबत कायम राहिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत सुनील नरेन पाठोपाठ किरॉन पोलार्ड (१८९ सामने) दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डने मुंबई इंडियन्सकडून २०१० ते २०२२ दरम्यान ३४१२ धावा आणि ६९ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.
Unwanted IPL Record : टीम इंडियात घेतलं; त्यालाच धु धु धुतलं! IPL मध्ये नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
IPL मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे परदेशी खेळाडू
- सुनील नरेन- २०० सामने, १८२० धावा, २०३ विकेट्स
- किरॉन पोलार्ड - १८९ सामने
- एबी डिव्हिलियर्स - १८४ सामने
- डेविड वॉर्नर - १८४ सामने
- ड्वेन ब्रावो - १६१ सामने
KKR ला तीन वेळा जेतेपद मिळवून देण्यात सुनील नरेन याने मोलाचा वाटा उचलला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक २०० सामने खेळण्याआधी या स्पर्धेत २०० विकेट्सचा टप्पा गाठण्याचा रेकॉर्डही त्याने आपल्या नावे केला आहेत. आतापर्यंत त्याने २०३ विकेट्स घेतल्या आहेत.
सर्वाधिक विकेट्स घेणारे परदेशी गोलंदाज
- सुनील नरेन - २०३ विकेट्स
- ड्वेन ब्रावो - १८३ विकेट्स
- राशीद खान- १७४ विकेट्स
- लसिथ मलिंगा - १७० विकेट्स
सुनील नरेन याने आपल्या फिरकीशिवाय फलंदाजीतही संघासाठी उपयुक्त कामगिरी केली आहे. २०१७ पासून त्याने आक्रमक सलामीवीराची भूमिकाही बजावली. २०२४ हंगामात त्याने ४८८ धावा ठोकत एक शतक आणि तीन अर्धशतकांसह सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडले होते.
कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
- सुनील नरेन - २००
- आंद्रे रसेल - १३३
- गौतम गंभीर - १०८
- युसूफ पठाण - १०६
Web Summary : Sunil Narine achieved a milestone, becoming the first foreign player to play 200 IPL matches for KKR. He also holds the record for most wickets (203) among foreign bowlers. Narine has been vital to KKR's success, contributing with both his spin bowling and aggressive batting.
Web Summary : सुनील नरेन ने एक मील का पत्थर हासिल किया, केकेआर के लिए 200 आईपीएल मैच खेलने वाले पहले विदेशी खिलाड़ी बने। विदेशी गेंदबाजों में उनके नाम सबसे ज्यादा विकेट (203) का रिकॉर्ड भी है। नरेन केकेआर की सफलता के लिए महत्वपूर्ण रहे हैं, उन्होंने अपनी स्पिन गेंदबाजी और आक्रामक बल्लेबाजी दोनों से योगदान दिया है।