लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणी दोन महिन्यांपासून तुरुंगात असलेला भोंदू अशोक खरात आता प्रस्तावित सिंहस्थ रिंगरोडमधील भूसंपादनामुळे आणखी मालामाल होण्याची चिन्हे आहेत.
रिंगरोडसाठी संपादित करावयाच्या क्षेत्रात खरात कुटुंबीयांची जमीन असून, त्यापोटी त्यांना प्रचलित दरानुसार सुमारे तीन कोटी रुपये मोबदला मिळण्याची चर्चा आहे. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना शासनदरबारी आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागतील.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कुंभमेळा रिंगरोड’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनात अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनी जात आहेत. प्रचलित दरानुसार त्या जमिनीचे मूल्य तीन कोटी असल्याचे सांगण्यात येते. अर्थात, त्यासाठी ही जमीन आपलीच असून, ती कोणाकडूनही बळजबरीने घेतली नसल्याचे पुरावे आता खरात कुटुंबीयांना सादर करावे लागतील.
खरातला मिळणारा मोबदला
गवळाणे शिवारातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातला सुमारे
८३ लाख रुपये मिळू शकतील. पाथर्डी शिवारातील भूसंपादनापोटी खरातच्या दोन्ही मुली, म्हणजेच तृप्तबाला आणि सृष्टी खरात यांना १ कोटी ८२ लाख रुपये मिळू शकतात.
निलंबित उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीलाही मिळणार लाभ
खरातप्रकरणी निलंबित असलेले उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीचे नावही या भूसंपादन प्रक्रियेत समोर आले आहे. खरातच्या या जमीन व्यवहाराशी संबंधित प्रक्रियेत भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपयांचा मोबदला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातच्या जमिनीत भांडे यांच्या पत्नीही सहभागीदार आहेत.
Web Summary : Despite being jailed for sexual assault and fraud, Ashok Kharat stands to gain ₹3 crore from land acquisition for the Nashik Simhastha Ring Road. His family will receive compensation for their land, provided they submit the necessary documents. A suspended official's wife is also reportedly involved.
Web Summary : यौन उत्पीड़न और धोखाधड़ी के आरोप में जेल में बंद अशोक खरात को नाशिक सिंहस्थ रिंग रोड के लिए भूमि अधिग्रहण से ₹3 करोड़ मिलने की संभावना है। उनके परिवार को उनकी जमीन के लिए मुआवजा मिलेगा, बशर्ते वे आवश्यक दस्तावेज जमा करें। एक निलंबित अधिकारी की पत्नी भी कथित तौर पर शामिल है।