शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 05:51 IST

शतकाच्या सुरुवातीला भारतातील प्रदूषित गंगा नदीत ऑक्सिजनची कमतरता जागतिक सरासरीपेक्षा २० पट अधिक वेगाने वाढत होती.

वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढीमुळे भारतासह सर्वच देशांच्या नद्यांतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मासे आणि नद्यांमध्ये राहणाऱ्या इतर जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे, असा इशारा एका नव्या अभ्यासात देण्यात आला आहे. चीनमधील संशोधकांनी उपग्रह आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने १९८५पासून जगभरातील २१०००हून अधिक नद्यांमधील ऑक्सिजन पातळीचा अभ्यास केला. त्यातील हा निष्कर्ष आहे. 

या शतकाच्या सुरुवातीला भारतातील प्रदूषित गंगा नदीत ऑक्सिजनची कमतरता जागतिक सरासरीपेक्षा २० पट अधिक वेगाने वाढत होती. जर जागतिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात मध्यम किंवा उच्च स्तरावरील वाढ कायम राहिली, तर या शतकाच्या अखेरीस पूर्व अमेरिका, आर्क्टिक, भारत आणि दक्षिण अमेरिकेतील मोठ्या भागांतील नद्या जवळपास १० टक्के ऑक्सिजन गमावू शकतात.

ऑक्सिजनमध्ये २.१% घट
यासंदर्भात ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या लेखानुसार १९८५पासून आतापर्यंत नद्यांमधील ऑक्सिजनची पातळी सरासरी २.१ टक्क्यांनी घटली आहे. पहिल्या दृष्टिक्षेपात ही घट फार मोठी वाटत नसली, तरी शास्त्रज्ञांच्या मते ही घट सतत वाढत राहाणार आहे.
जर हीच गती कायम राहिली किंवा आणखी वाढली, तर या शतकाच्या अखेरीस पूर्व अमेरिकेतील, भारतातील आणि उष्णकटिबंधीय भागांतील अनेक नद्यांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण इतके कमी होईल की मासे गुदमरू लागतील व नद्या ‘ऑक्सिजनविरहित’ वाहतील. 

गरम पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण होतेय कमी
नानजिंग स्थित ‘चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’चे पर्यावरण शास्त्रज्ञ ची गुआन म्हणतात, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्रातील मुलभूत तत्वांनुसार गरम पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते.
हवामान बदलामुळे पाणी अधिक गरम होत आहे आणि त्यामुळे अधिक ऑक्सिजन वातावरणात निघून जात आहे. जर ऑक्सिजन घटण्याचा सध्याचा वेग कायम राहिला, तर या शतकाच्या अखेरीस जगातील नद्या अजून चार टक्के ऑक्सिजन गमावतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Global river oxygen levels plummeting due to climate change: Study

Web Summary : A new study warns that rising global temperatures are causing a rapid decline in river oxygen levels worldwide, threatening aquatic life. India's Ganga River is experiencing an alarming rate of oxygen depletion. If carbon emissions remain high, rivers in regions like India could lose up to 10% of their oxygen by the century's end.
टॅग्स :Heatwaveउष्णतेची लाट