शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 06:15 IST

NEET Paper Leak Case: नांदेडमध्ये सीबीआयची ८ तास चौकशी. अश्विनी भाऊराव कदम यांच्या घरावर छापा. १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला मिळाले ५६० गुण. वाचा सविस्तर वृत्त.

नांदेड : पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले असून शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेडातील विद्युतनगर भागात धडक कारवाई केली. येथील कदम कुटुंबीयांच्या निवासस्थानी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी आणि झाडाझडती घेण्यात आली. मुलीसाठी पाच लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप या कुटुंबावर आहे. लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळीच विद्युतनगर भागातील अश्विनी भाऊराव कदम यांच्या फ्लॅटवर छापा टाकला. या पथकाने सकाळपासूनच घरातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. कदम यांनी आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

पुरावे नष्ट करण्यासाठी फोन? 
नीट पेपरफुटी प्रकरणात काही आरोपींना अटक झाल्यानंतर, कदम यांना नागपूर येथून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. “पेपर संदर्भातील सर्व कागदपत्रे तातडीने जाळून टाका,” असा सल्ला या फोनवरून देण्यात आला होता. 

मुलीला ५६० गुण कसे मिळाले?
नांदेडमध्ये तयारी करीत असताना सदर विद्यार्थिनीला केवळ १०० ते १२० गुण मिळत होते. त्यानंतर झालेल्या नीट परीक्षेत तिचा स्कोअर ५६० येऊ लागला. हे ऐकून नातेवाईक आणि तिचा मित्र परिवारही अवाक् झाला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Exam: CBI Investigates Nanded Parents for Alleged Paper Purchase

Web Summary : CBI raided a Nanded family, suspecting they bought the NEET paper for their daughter for ₹5 lakh. The family was advised to destroy evidence after arrests were made in the paper leak case, raising suspicions due to student's score jump.
टॅग्स :NEET Exam Paper Leakनीट परीक्षा पेपर लीकNEET Examनीट परीक्षा