शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
2
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
3
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
4
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
5
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
6
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
7
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
8
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
9
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
10
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
11
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
12
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
13
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
14
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
15
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
16
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
17
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
18
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
19
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
20
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 12:01 IST

रात्री खाल्लेलं कलिंगड सकाळी एका कुटुंबाच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. 

ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फूड पॉयझनिंगमुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर त्याच कुटुंबातील इतर पाच जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेमुळे केवळ कुटुंबच उद्ध्वस्त झालं नाही, तर संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्री खाल्लेलं कलिंगड सकाळी एका कुटुंबाच्या जीवावर बेतल्याचं म्हटलं जात आहे. 

कलिंगड खाल्ल्यानंतर तब्येत बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रपाडा जिल्ह्यातील पट्टामुंडई ब्लॉकच्या कुपुनी गावात गुरुवारी रात्री एका कुटुंबाने कलिंगड खाल्लं होते. हे फळ त्यांची प्रकृती इतकी गंभीर करेल, याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. सकाळ होताच कुटुंबातील सदस्यांनी पोटदुखीची तक्रार करण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच त्यांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले.

एकाच वेळी ६ जण आजारी

कुटुंबातील एकूण ६ जण अचानक गंभीर आजारी पडले. प्रकृती खालावत असल्याचं पाहून सर्वांना तातडीने केंद्रपाडा जिल्हा मुख्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तिघांवर उपचार सुरू करण्यात आले, तर दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना कटक येथे रेफर (हलवण्यात) करण्यात आलं. उपचारादरम्यान कुटुंबातील स्वाधीन सेनापती या मुलाचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

 ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!

कुटुंबाने सांगितली घडलेली घटना

कुटुंबातील चारुलता सेनापती यांनी सांगितलं की, रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर सकाळी मुलं जेव्हा ट्यूशनवरून परत आली, तेव्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यांना उलट्या, पोटदुखी आणि जुलाब असा त्रास सुरू झाला. त्यांनी पुढे सांगितलं की, कुटुंबातील पाच जण रुग्णालयात दाखल असून त्यांच्यापैकी काहींवर केंद्रपाडा तर काहींवर कटक येथे उपचार सुरू आहेत.

सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'

डॉक्टर काय म्हणाले?

केंद्रपाडा जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर अंबिका प्रसाद नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये उलट्या, जुलाब आणि पोटदुखीची लक्षणं आहेत. प्राथमिक तपासणीत त्यांनी हे फूड पॉयझनिंगचं प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोग्य विभाग सतर्क झाला असून, कलिंगडामध्ये काही होतं का की फूड पॉयझनिंगचं कारण काही वेगळं होतं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टॅग्स :OdishaओदिशाDeathमृत्यूHospitalहॉस्पिटल