Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 14:12 IST

फ्रान्समध्ये पोहोचली सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी

फ्रान्समध्ये सध्या प्रतिष्ठित ७९ व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' चा दिमाखदार सोहळा सुरू आहे. दरवर्षी या मानाच्या रेड कार्पेटवर बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटी हजेरी लावतात. मात्र, यंदाचा कान्स फेस्टिव्हल मराठी मनोरंजन विश्वासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरला आहे. 'अभिजात मराठी' (मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा) अंतर्गत महाराष्ट्रातील लाडके दिग्गज अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, ग्लॅमरस अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर फ्रान्सला पोहोचले आहेत. प्राजक्ता माळीने तिथून एक व्हिडीओही शेअर केला आहे. 

मराठी कलाकारांचा फ्रान्समधील व्हिडिओ व्हायरल

कान्स फेस्टिव्हलमध्ये मराठीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिग्गज अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अभिजात मराठीचे केदार जोशी हे सर्व फ्रान्समध्ये दाखल झाले. तिथून त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्राजक्ता माळीने व्हिडीओमधून तिथली एक झलक दाखवली आहे. मरुन रंगाच्या गाऊनमध्ये प्राजक्ता अतिशय सुंदर दिसत आहे. तर समोर अशोक सराफ, निवेदिता सराफ बसलेले आहेत. ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारत पॅव्हिलियन येथे अभिजात मराठीचं ग्लोबल लाँच पार पडलं. यावेळी प्रसिद्ध फिल्ममेकर आशुतोष गोवारीकरही उपस्थित होते. कान्समध्ये मराठीचं प्रतिनिधित्व करताना सर्वांच्याच चेहऱ्यावर विशेष आनंद दिसत होता.


'अभिजात मराठी'चा आंतरराष्ट्रीय मंचावर डंका

मराठी भाषेला लाभलेल्या अभिजात भाषेच्या दर्जाचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी आणि मराठी चित्रपटांचे जागतिक पातळीवर प्रमोशन करण्यासाठी या शिष्टमंडळाची कान्स फेस्टिव्हलसाठी निवड करण्यात आली आहे. 'अभिजात मराठी'च्या वतीने महाराष्ट्राची संस्कृती, मराठी सिनेमा आणि भाषेचा समृद्ध वारसा जागतिक चित्रपटसृष्टीसमोर मांडणे, हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासारखे दिग्गज चेहरे मराठी सिनेसृष्टीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi shines at Cannes: Prajakta Mali shares video, stuns in gown.

Web Summary : Marathi cinema reached Cannes! Prajakta Mali, Ashok Saraf, and Nivedita Saraf attend the Cannes Film Festival for 'Abhijat Marathi' global launch. Prajakta shared a video, showcasing her maroon gown, celebrating Marathi culture internationally.
टॅग्स :प्राजक्ता माळीकान्स फिल्म फेस्टिवलमराठी अभिनेता