शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
6
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
7
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
8
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
9
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
10
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
11
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
12
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
13
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
14
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
15
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
16
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
17
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
18
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
19
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
20
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
Daily Top 2Weekly Top 5

पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 14:26 IST

Russia News: जागतिक पातळीवर  कमालीची युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर  पुतिन हे एका पेक्षा एक अशा विध्वंसक हत्यारांचा साठा गोळा करत आहेत.

जागतिक पातळीवर  कमालीची युद्धजन्य आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असताना रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर  पुतिन हे एका पेक्षा एक अशा विध्वंसक हत्यारांचा साठा गोळा करत आहेत. ही हत्यारे एवढी धोकादायक आहेत की, ज्यांचं एक बटण दाबताच संपूर्ण देश नष्ट होऊ शकतो. रशियाचे शास्त्रज्ञ अणुऊर्जेवर चालणारे ड्रोन, हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, अवकाशात हल्ला करणारी हत्यारे आणि अणुउर्जेवर चालणारे पाणतीर विकसित करत  आहेत. या सर्व घडामोडींमुळे जग १९६२  च्या क्युबा क्षेपणास्त्र संकटानंतरच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आण्विक संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी भीती पाश्चात्य विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. 
रशियाकडून साठा करण्यात येत असलेल्या शस्त्रास्त्रांमधील प्रमुख शस्त्रास्त्रे  खालील प्रमाणे आहेत.

पोसायडन: रशियाकडून साठा करण्यात येत असलेल्या सर्वात चर्चित हत्याराचं नाव पोसायडन आहे. हे अणुउर्जेवर चालणारं महाकाय अंडरवॉटर ड्रोन आहे. ते लहान पाणबुडीएवढं मोठं आहे. ते हजारो किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. तसेच  शत्रूच्या किनाऱ्याजवळ गेल्यानंतर त्याचा स्फोट होतो.  

बुरेवेस्तनिक: बुरेवेस्तनिक क्षेपणास्त्राला फ्लाइंग चेर्नोबिल असंही म्हटलं जातं. हे  अणुशक्तीवर चालणारं क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज अमर्यादित असल्याचा दावा केला जातो.  पुतिन  यांच्या मते हे क्षेपणास्त्र अनेक दिवसांपर्यंत  उडू शकतं.

सरमत: सरमत किंवा Satan-2 हे रशियाचं नवं आंतरखंडीय बॅलेस्टिक  क्षेपणास्त्र  आहे. याचं वजन २००  टनाहून अधिक आहे. यामध्ये अनेक अण्वस्त्रे जोडता येतात. तसेच  ती वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करू शकतात. 

याशिवाय एवनगार्ड, किंझल, जिरकॉन यांसारखी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ही रशियाच्या ताफ्यात  आहेत. तसेच यांचा वेग एवढा प्रचंड  आहे की, ज्यामुळे सध्याची कुठलीही डिफेन्स सिस्टिम  त्यांना रोखू शकत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Putin's Superweapons: Russia Accumulates Doomsday Arsenal Amid Rising Global Tensions

Web Summary : Russia is amassing nuclear-powered drones, hypersonic missiles, and space-based weapons, escalating global nuclear threat. Poseidon, Burevestnik, and Sarmat missiles are key components. Current defense systems struggle against these advanced weapons, raising international concerns about a new arms race.
टॅग्स :russiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनInternationalआंतरराष्ट्रीय