शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
6
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
7
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
8
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
9
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
10
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
11
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
12
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
13
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
14
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
15
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
16
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
17
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
18
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
19
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
20
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
Daily Top 2Weekly Top 5

मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 14:27 IST

Kalyan Railway Station Minor Girl Rape News: मामाची भेट घेण्यासाठी अहिल्यानगरहून आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कल्याण रेल्वेस्थानक परिसरात घडली.

मामाची भेट घेण्यासाठी अहिल्यानगरहून आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना कल्याण रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी संध्याकाळी घडली. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत आरोपीला अटक केली आहे. सौरभ सोनावणे (वय, २३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   न्यायालयाने सौरभला २१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अहिल्यानगर येथे राहणारी असून, तिचे मामा खोपोलीत राहतात. आपल्या मामाला भेटण्यासाठी ती रेल्वेने प्रवास करून कल्याण स्थानकावर आली. कल्याण स्थानकावर उतरल्यानंतर ती खोपोलीला जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाट पाहत प्लॅटफॉर्मवर थांबली. त्याच वेळी आरोपी सौरभ सोनावणे याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेतला. आरोपीने पीडितेच्या जवळ जाऊन आधी तिचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा बहाणा केला आणि घाबरवून रेल्वेच्या यार्डात घेऊन गेला. तिथे त्याने या १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला.

या भयंकर प्रसंगातून पीडित मुलीने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. तिने थेट कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि तपासाची चक्रे फिरवली. लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातील आणि यार्डाच्या बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे आरोपी सौरभ सोनावणेची ओळख पटवून पोलिसांनी त्याला काही तासांतच बेड्या ठोकल्या. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. रेल्वेस्थानकांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 14-Year-Old Girl Assaulted at Kalyan Railway Yard; Accused Arrested

Web Summary : A 14-year-old girl visiting her uncle was assaulted at Kalyan Railway Yard. Police swiftly arrested the accused, Saurabh Sonawane, raising concerns about station security. The victim reported the incident, leading to a rapid investigation and arrest.
टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी