ग्लॅमरच्या दुनियेत कधी कोणाचं नशीब बदलेल, काही सांगता येत नाही. येथे एका क्षणात सामान्य माणूस सेलिब्रिटी बनतो. तर दुसरीकडे चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आज अत्यंत हलाखीचं आणि गरिबीचं जीवन जगत आहेत. सध्या सोशल मीडियावर 'शीला' नावाच्या एका महिलेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या महिलेचा दावा आहे की, तिने कधीकाळी चित्रपटांमध्ये काम केलं होतं, पण आज लोक तिला 'वेडी' म्हणतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेने या महिलेसोबत डान्स केला, ज्यानंतर आता सर्वत्र या महिलेचीच चर्चा रंगली आहे.
तनुज मिश्रा नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक महिला रस्त्यावर भीक मागून आपलं पोट भरताना दिसत आहे. फाटके कपडे, विस्कटलेले केस आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिसणाऱ्या या महिलेने सांगितलं की, तिने चित्रपटांमध्ये काम केलं आहे. महिला व्हिडिओमध्ये म्हणते, "माझं नाव शीला आहे. मी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मी अनाथ आहे आणि माझं या जगात कोणीच नाही. सध्या मला राहण्यासाठी कुठेही जागा नाही. आता मरण्याची वेळ आली आहे."
लोक म्हणाले वेडी
लोकांनी शीलाला 'वेडी' समजून दुर्लक्षित केलं होतं. परंतु, पोलिसांच्या मदतीने त्यांना एका अनाथाश्रमात पोहोचवण्यात आलं. गेल्या ६ महिन्यांत त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. आता त्यांचे केस व्यवस्थित कापले असून, त्या अत्यंत स्वच्छ आणि चांगल्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. इतकंच नाही तर, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदेने शीलासोबत डान्स करून त्यांना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवून दिली.
शिल्पा शिंदेवर होतोय कौतुकाचा वर्षाव
शिल्पा शिंदे आणि शीला यांच्या डान्सचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक कमेंट्समध्ये शिल्पाचं भरभरून कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटलं "शिल्पा, तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही." दुसऱ्याने लिहिलं, "शिल्पा शिंदे मनाची खूप चांगली आहे." एखाद्या असहाय्य व्यक्तीला मदत कशी करावी, हे कोणीतरी तुझ्याकडून शिकावं, तू खरोखरच डाऊन टू अर्थ कलाकार आहेस असंही लोक म्हणत आहेत.
Web Summary : Actress Sheila, once in films, now begs on the streets. A video went viral, showing her plight. Actress Shilpa Shinde danced with her, bringing attention and support. She's now in a shelter, her life transformed.
Web Summary : कभी फिल्मों में काम करने वाली अभिनेत्री शीला आज सड़क पर भीख मांग रही है। उसका एक वीडियो वायरल हुआ, जिसमें उसकी हालत दिखाई गई। अभिनेत्री शिल्पा शिंदे ने उसके साथ डांस किया, जिससे उसे ध्यान और समर्थन मिला। अब वह एक आश्रय में है, उसका जीवन बदल गया है।