Join us
Daily Top 2Weekly Top 5

"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 13:54 IST

"रजनीकांत इतकाही नीच नाही की अशाप्रकारे कोणावर कमेंट करेल. विजय मुख्यमंत्री झाला म्हणून माझा जळफळाट का होईल?", असं त्यांनी म्हटलं. 

तामिळनाडूतील निवडणुकीवर सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी(१७ मे) प्रेस कॉन्फरन्स घेत भाष्य केलं. जोसेफ विजय तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांच्या टीवीकेला या निवडणुकीत विजय मिळाल्याने रजनीकांत नाराज असल्याचं बोललं जात होतं. यावर रजनीकांत यांनी अखेर मौन सोडत अफवा पसरवणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. "रजनीकांत इतकाही नीच नाही की अशाप्रकारे कोणावर कमेंट करेल. विजय मुख्यमंत्री झाला म्हणून माझा जळफळाट का होईल?", असं त्यांनी म्हटलं. 

रजनीकांत म्हणाले, "मी ही प्रेस कॉन्फरस यासाठी घेत आहे कारण जर मी या अफवांवर स्पष्टीकरण दिलं नाही, तर त्या खऱ्या आहेत असा लोकांचा समज होईल. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मी एमके स्टालिन यांना भेटायला गेलो होतो आणि तो चर्चेचा विषय बनला. आमची मैत्री राजकारणापलिकडे आहे. एका मित्राच्या नाते कुलथूरमधून एमके स्टालिन यांचा पराभव झाल्यामुळे मला निश्चितच दु:ख झालं. विजयला मुख्यमंत्री झालेलं मला पाहायचं नाही, अशा अफवा पसरल्या होत्या. मी विजयचं एअरपोर्टवर अभिनंदन केलं नाही, असंही काही लोक म्हणाले. मी त्याला एक्सवर शुभेच्छा दिल्या होत्या. विजय मुख्यमंत्री झाल्यावर मी हैराण झालो, पण मी त्याचं अभिनंदन केलं होतं". 

"मी एवढाही नीच नाही किंवा खालच्या पातळीचा व्यक्ती नाही की उगाचच कोणावरही कमेंट करेन. माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मग मला विजय मुख्यमंत्री झाला म्हणून माझा जळफळाट का होईल? कदाचित कमल हसन मुख्यमंत्री झाला असता तर मला वाईट वाटलं असतं. विजय आणि माझ्यात २५ वर्षांचं अंतर आहे. त्याने ५२व्या वयातच एमजीआर आणि एनटीआरपेक्षा जास्त यश मिळवलं आहे. केंद्रातील भाजपाची सत्ता आणि इथे दोन स्थापित पक्षांविरोधात निवडणूक लढवत त्याने विजय मिळवला. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. पण, म्हणून माझा जळफळाट होत नाहीये. मला विजयकडून अनेक अपेक्षा आहेत आणि माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत", असंही रजनीकांत म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rajinikanth Denies Jealousy Over Vijay's Political Success, Dismisses Trolls

Web Summary : Rajinikanth refuted claims of animosity towards Vijay's political rise. He clarified that his friendship with Stalin transcends politics and he harbors no ill will towards Vijay's achievements, emphasizing his blessings for Vijay's future endeavors.
टॅग्स :थलपती विजयरजनीकांत