शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:47 IST

Gokul Milk Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा वातावरणात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित केल्या असताना केवळ गोकुळची निवडणूकच का घेतली जाते, ती स्थगित करावी, अशी मागणी सत्तारूढ गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आल्याचे समजते.

ठळक मुद्दे कोरोनाचे वाढलेल्या रूग्णांचा मुद्दा न्यायालयाच्या भूमिकेकडे सहकार क्षेत्राच्या नजरा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक स्थगितीसाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा वातावरणात सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका स्थगित केल्या असताना केवळ गोकुळची निवडणूकच का घेतली जाते, ती स्थगित करावी, अशी मागणी सत्तारूढ गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आल्याचे समजते.ह्यगोकुळह्णच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. मात्र कोरोनामुळे सर्वच संस्थांच्या निवडणूका लांबणीवर टाकल्या आहेत. निवडणूका लांबलेल्या काळात सत्तारूढ गटात अंतर्गत धूसफुस वाढत गेली, याचा अंदाज नेत्यांना आल्याने कोरोनाचा आधार घेऊन निवडणूका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न राहिला. काही संचालकांनी तर निवडणूका आणखी वर्षभर पुढे जाव्यात यासाठी देवच पाण्यात घातले होते.

उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने प्रक्रिया सुरू झाली मात्र याविरोधातही सत्तारूढ गट न्यायालयात गेला. न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेश दिले, त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूकही झाली. येत्या दोन दिवसात प्रत्येक्ष निवडणूकाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. तोपर्यंत निवडणूकीला स्थगिती द्यावी,यासाठी सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यावर न्यायालय नेमके काय मत नोंदवते, याकडे सगळ्या सहकार क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.सत्तारूढ गट निवडणूकीला घाबरतो कागेली तीस-चाळीस वर्षे गोकुळवर एकहाती सत्ता असल्याने प्रत्येक पंचवार्षिक मध्ये सत्तारूढ गट केव्हाही सज्ज असायचा. मात्र संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच बचावात्मक भूमिका घेतली आहे. सत्ता राखताना मागील निवडणूकीत झालेली दमछाक, मल्टीस्टेट व नोकरभरतीमुळे संस्था प्रतिनिधींच्या मनात असलेला राग व त्यातच सत्तारूढ गटाला पडलेल्या खिंडार, या सगळ्यांमुळे सत्तारूढ गटाला आताच निवडणूका नको आहेत. त्यामुळे कोरोनाच्या आडून निवडणूका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संस्था प्रतिनिधींमध्ये चर्चा आहे.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर