शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये पुन्हा ‘गोकुळ’ नांदणार?

By admin | Updated: January 10, 2015 00:20 IST

उमेदवारीची चर्चा : विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांना कडवा विरोध शक्य

संदीप बावचे-जयसिंगपूर -गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजत असले तरी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत यावेळी उमेदवारी कोण मिळविणार, याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. विद्यमान अध्यक्ष दिलीपराव पाटील हे इच्छुक आहेत. मात्र, स्थानिक गटबाजी व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा रंग वाढल्याने ‘गोकुळ’चे अध्यक्ष पाटील यांना कडवा विरोध होण्याची शक्यता आहे.
शिरोळ-हातकणंगले या दोन तालुक्यांचा एकच मतदारसंघ आहे. हातकणंगले तालुक्यात ७६, तर शिरोळ तालुक्यात १२३ दूध संस्था आहेत. शिरोळ तालुक्यात डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. सा. रे. पाटील गटाची मोठी ताकद आहे, तर हातकणंगले तालुक्यात महाडिक, इंगवले, आवाडे गटांचे प्राबल्य आहे. उमेदवारीसाठी संस्थेचे ठराव गोळा करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे.
गेली १५ वर्षे दिलीपराव पाटील यांनी गोकुळ दूध संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे या संघाचे अध्यक्षपदही मिळविण्यात पाटील यांनी बाजी मारली आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक जाहीर होताच पाटील यांना नेहमीच शिरोळ तालुक्यातून कडवा विरोध व्हायचा. पण, विरोधकांच्या डावपेचात पाटील कधीच सापडले नाहीत. नुकत्याच झालेल्या शिरोळ विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी नातेसंबंधामुळे शिवधनुष्याला मदत केली. स्वकीय असणाऱ्या कॉँग्रेस पक्षातील काही कार्यकर्त्यांना त्यांनी दुखावले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना कडवा विरोध पुन्हा होणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे उट्टे काढण्यासाठी हातकणंगले तालुक्यातून गोकुळ दूध संघाचा प्रतिनिधी द्यायचा, अशी नवी खेळी होण्याची शक्यता आहे.
दरगोबा दूध संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब गावडे यांनी प्रत्येक निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळावे म्हणून दावा केला होता; पण त्यांना हुलकावणीच मिळाली. यंदा बदलत्या राजकीय समीकरणामुळे गावडे यांना काही राजकीय नेत्यांचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांचे गावडे हे खंदे कार्यकर्ते आहेत.

‘महादेवा’ची कृपा कुणावर ?
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत आमदार महादेवराव महाडिक यांना मानणारा गट आहे. या तालुक्यात महाडिक गटाने राजकीय वजन निर्माण केले आहे. गत गोकुळ निवडणुकीत अमल महाडिक यांची संधी हुकली आहे. त्यामुळे महाडिक या निवडणुकीत ‘गोकुळ’ची उमेदवारी देताना सच्चा कार्यकर्त्यांना की, नातेसंबंधाला वारसदार ठरवितात. ‘महादेवा’ची कृपा कोणावर राहणार, यावरच उमेदवारी निश्चित होणार आहे.