शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक स्थगितीसाठी गोकुळ पुन्हा उच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 10:14 IST

Gokul Milk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिले असून यावर सोमवारी (दि. ८) सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक स्थगितीसाठी गोकुळ पुन्हा उच्च न्यायालयातसोमवारी सुनावणी : शासनाच्या परिपत्रकालाच दिले आव्हान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली आहे. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या निवडणूक स्थगितीच्या आदेशालाच त्यांनी आव्हान दिले असून यावर सोमवारी (दि. ८) सुनावणी होणार आहे.राज्य शासनाने कोविडच्या रुग्णात वाढ होत असल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २४ फेब्रुवारी रोजी स्थगिती दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरूच राहिली. आदेशाबाबत स्पष्टीकरण मिळावे, यासाठी गोकुळने याचिका दाखल केली होती. मात्र, सुनावणीनंतर ती मागे घेतली. तोपर्यंत प्रारूप यादीवरील हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

पुन्हा गोकुळने उच्च न्यायालयाच याचिका दाखल करत निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी केली. शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या आदेशाला आव्हान दिले असून, या स्थगितीमधून ह्यगोकुळह्णला वगळू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाच्या वतीने विभागीय सहनिबंधक मुंबई बाजीराव शिंदे, तर प्राधिकरणाच्या वतीने विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांना प्राधिकृत केले आहे.शासनाच्या भूमिकेवरच निवडणुकीचे भवितव्यराज्य शासनाच्या आदेशाला आव्हान दिल्याने आता त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. शासन नेमके म्हणणे काय मांडणार, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.इतर संस्थांवर परिणाम नाहीन्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ४१ सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. त्यापैकी २१ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. वीस संस्थांमध्ये गोकुळचा समावेश आहे. निवडणूक नको म्हणून ह्यगोकुळह्ण जरी न्यायालयात गेले असले तरी त्या निकालाचा परिणाम उर्वरित संस्थांवर होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.गोकुळने यांना केले प्रतिवादी....

  • राज्य शासन
  • सहकार आयुक्त, विभागीय उपनिबंधक (दुग्ध)
  • सहायक निबंधक (दुग्ध)

गोकुळ हरकतींवरील निकालाबाबत उत्सुकतागोकुळ दूध संघाच्या प्रारूप यादीवरील हरकतींची सुनावणी पूर्ण झाली. आक्षेपांमध्ये अनेक गमतीजमती समोर आल्याने निकालाबाबत संस्थांमध्ये उत्सुकता आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर हे निकाल देणार आहेत.गोकुळच्या यादीवर ७१ हरकती आल्या होत्या. त्यातील ३५ हरकती या दुबार ठरावांवर होत्या. सुनावणीदरम्यान १४ जणांनी माघार घेतली, तर तीन तक्रारदार गैरहजर राहिल्याने १८ दुबार ठरावधारकांचे म्हणणे दाखल झाले. यामध्ये सासू मृत झाल्यानंतर दोन्ही सुनांनी ठरावावर दावा केला आहे.

आता अधिकृत ठरावधारक सून कोण? हे शोधण्याचे काम दुग्ध विभागाला करायचे आहे. अशा गमतीजमती सुनावणीदरम्यान समोर आल्या आहेत. दोन संचालक मंडळ उपस्थित करून ठरावाला आव्हान दिले आहे. सहा संस्थांचे ठरावच बदला, अशी मागणी राधानगरीतील एकाने केली आहे. यासह इतर हरकतींवर दुग्ध विभाग काय निकाल देतो, याबाबत उत्सुकता लागली आहे.निवडणुकीबाबत गोकुळने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी आहे. मात्र दुग्ध विभाग नियोजित वेळापत्रकानुसार सकाळी अकरा वाजताच निकाल देऊ शकतो. निकालाचा परिणाम अंतिम यादीवर होऊ शकतो.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक