शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी इच्छुकांची ‘फिल्डिंग’

By admin | Updated: November 3, 2016 00:43 IST

महानगरपालिका : माधवी गवंडी, हसीना फरास, अनुराधा खेडकर इच्छुक ; विरोधी आघाडीही लढणार

  कोल्हापूर : महानगरपालिकेत अश्विनी रामाणे यांची महापौरपदाची मुदत १५ नोव्हेंबरला संपत असल्याने या पदासाठी इच्छुक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नेत्यांना प्रसन्न करण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. या पदासाठी माधवी प्रकाश गवंडी, अनुराधा सचिन खेडकर आणि हसीना बाबू फरास या तीन नगरसेविका इच्छुक असून त्यांनी हे पद मिळविण्यासाठी नेत्यांकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली आहे. येत्या आठवड्यात याबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महानगरपालिकेत गेल्याच वर्षी नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर आली; पण विरोधी बाकावर बसलेल्या भाजप-ताराराणी आघाडीही चिकाटीने लढून सत्तेच्या नजीक पोहोचली होती; पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना महापौर निवडणुकीत चमत्कार घडविता आला नाही. सध्या महापालिकेत काँग्रेस २९, राष्ट्रवादी काँग्रेस १५, भाजप १४, ताराराणी आघाडी १९ तर शिवसेना ४ असे संख्याबळ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करत जागावाटप करताना पदे वाटपाचा फॉर्म्युला ठरविला. पहिल्या वर्षी महापौरपदावर काँग्रेसच्या अश्विनी रामाणे तर उपमहापौरपदावर राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला विराजमान झाल्या. या पदाची मुदत १५ नोव्हेंबरला संपत आहे. पुढील महापौरपद हे राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने त्यासाठी माधवी गवंडी, अनुराधा खेडकर, हसीना फरास या तीन नगरसेविका इच्छुक आहेत. या तिघांनी या पदासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत आदिल फरास यांना स्थायी समिती सभापतिपद तर सचिन खेडकर यांना उपमहापौरपद देण्यात आले होते. त्यामुळे यंदा महापौरपदासाठी माधवी गवंडी ह्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. त्या पद्धतीने गवंडी यांनी नेत्यांकडे याबाबत आपले गाऱ्हाणे मांडले आहे. (प्रतिनिधी) पदासाठी चाचपणी : उपमहापौर, स्थायी सभापतीसाठीही तयारी राष्ट्रवादीला महापौरपद मिळणार असल्याने आता उपमहापौरपद आणि स्थायी सभापती ही दोन्हीही पदे काँग्रेसकडे राहणार.संजय मोहिते स्थायी सभापतिपदासाठी इच्छुक असले तरीही ते उपमहापौरपदासाठी चाचपणी करत आहेत. फेबु्रवारीत होणाऱ्या स्थायी सभापतिपदासाठी मोहितेसह राहुल माने, संदीप नेजदार, भूपाल शेटे, दिलीप पवार हेही इच्छुक आहेत; पण कारकिर्दीत ज्यांनी कोणतीही पदे उपभोगली नाहीत त्यांची वर्णी सभापतिपदासाठी लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नेजदार आणि माने यांची नावे अग्रभागी चर्चली जात आहेत. महापौर हे ठरल्या वेळेनुसार आपल्या पदाचा राजीनामा निश्चित देतील तसेच संख्याबळानुसार काँग्रेसला पदे वाढवून मिळण्याबाबत पुढील आठवड्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत बैठक घेऊ. - सतेज पाटील, आमदार नेते आमदार सतेज पाटील यांचा आदेश आल्यानंतर आम्ही त्वरित राजीनामा देऊ; पण महापालिकेतील दोन्ही आघाडीतील सत्तासंघर्ष पाहता नगरपालिका निवडणुकीनंतर नेते या महापौरपदाच्या बदलांबाबत हालचाली करतील. - अश्विनी रामाणे, महापौर महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक भाजप-ताराराणी आघाडी लढविणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला ही निवडणूक बिनविरोध करू देणार नाही, तसेच आमचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे धोरण आहे. - विजयराव सूर्यवंशी, भाजप, गटनेते महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. राज्यात भाजप-सेना युती असल्यामुळे त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीसाठी होईल. शिवसेना महापौर निवडणुकीत मदत करेल. - सत्यजित कदम, ताराराणी आघाडी, गटनेते