शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसाठी संपूर्ण टोलमुक्ती हीच भूमिका : साळोखे

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

संपूर्ण टोलमुक्ती हाच कोल्हापूरचा निर्धार आहे. त्यामुळे ‘एमएच ०९’ची अधिसूचना सरकारने काढली नाही.

कोल्हापूर : कोल्हापूर संपूर्ण टोलमुक्त व आय.आर.बी. कंपनीला येथून हटविणे हीच शेवटपर्यंत जनतेची भूमिका असल्याचे कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी रविवारी ‘लोकमत’ला बोलताना सांगितले.साळोखे म्हणाले, कोल्हापुरात गतआठवड्यात भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, एमएच ०९ पासिंगची वाहने वगळण्याबाबत आम्हीच अधिसूचना काढू नका, असे सांगितले होते. संपूर्ण टोलमुक्ती हाच कोल्हापूरचा निर्धार आहे. त्यामुळे ‘एमएच ०९’ची अधिसूचना सरकारने काढली नाही. राज्य सरकारने नेमलेल्या फेरमूल्यांकन समितीचे अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. सुमारे २० जूनपर्यंत फेरमूल्यांकन समिती राज्य शासनाला आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर फडणवीस सरकार यावर निर्णय घेईल. त्याचबरोबर पूर्वी कोल्हापुरात झालेल्या रस्त्यांचे मूल्यांकन हे मंत्रालयात बसून झाले होते; पण, सध्याच्या फेरमूल्यांकन समितीमध्ये असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळ, कोल्हापूर महापालिका व टोलविरोधी कृती समितीतील सदस्यांनी पारदर्शकपणे व प्रत्यक्ष सर्व्हे केला आहे. त्यामुळे हा अहवाल सकारात्मक असेल. ही समिती जून महिन्यात सरकारला अहवाल देईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे यातून निर्णय घेऊन कोल्हापूर संपूर्ण टोलमुक्त करणार आहेत.दरम्यान, टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला फडणवीस यांनी कोल्हापुरात भाजप राज्यस्तरीय बैठकीवेळी ‘कोल्हापूरला संपूर्ण टोलमुक्ती केली जाईल,’ असे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)