शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची महासरस्वती रूपात दर्शन - अष्टमीनिमित्त नगरप्रदक्षिणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 18:35 IST

Navratri, ambabaitemple, mahalaxmi, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला, शुक्रवारी कोल्हापुरातील श्री करवीरनिवासिनी अंबाबाईची महासरस्वतीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. करवीरमाहात्म्य ग्रंथातील संदर्भानुसार ही पूजा बांधली असून, यात देवी अगस्ती व लोपामुद्रा यांनी केलेली स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात सजली आहे.

ठळक मुद्देअंबाबाईची महासरस्वती रूपात दर्शन अष्टमीनिमित्त नगरप्रदक्षिणा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला, शुक्रवारी कोल्हापुरातील श्री करवीरनिवासिनी अंबाबाईची महासरस्वतीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. करवीरमाहात्म्य ग्रंथातील संदर्भानुसार ही पूजा बांधली असून, यात देवी अगस्ती व लोपामुद्रा यांनी केलेली स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात सजली आहे.करवीरमाहात्म्य हा ग्रंथ अगस्ती मुनी व लोपामुद्रा यांच्या संवादातून उलगडतो. त्यामुळे आजही अंबाबाईची पालखी घाटी दरवाजाबाहेर दीपमाळेला प्रदक्षिणा घालते, जिथे या दोघांच्याही मूर्ती आहेत. हे मंदिर त्रिकूटप्रासाद म्हणून ओळखले जाते. येथे अंबाबाईसोबतच महाकाली आणि महासरस्वतीचे स्वतंत्र मंडप, गाभारा आणि प्रदक्षिणायुक्त मंदिर आहे.

आज या मंदिरात दक्षिणाभिमुख महाकालीची विराजमान मूर्ती ही चतुर्भूज महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे, जी करवीरची शक्तिपीठ देवता आहे. महाअष्टमीचा होम हिच्यासमोरच होतो; तर महासरस्वतीची मूर्ती ही चतुर्भूज आणि बैठी असून अभय, अंकुश, पाश, वरद अशी आयुधे व मुद्रा धारण करते. या तिघींचेही दर्शन महर्षी अगस्तींनी घेतले होते. ज्या पूजेत अंबाबाई अगस्ती व लोपामुद्रा यांनी केलेली स्तुती ऐकणाऱ्या महासरस्वतीच्या रूपात सजली आहे. ही पूजा पराग ठाणेकर व योगेश जोशी यांनी बांधली.दरम्यान, महाअष्टमीनिमित्त रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती सजविलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला निघणार आहे. यंदा कोरोनामुळे हे वाहन सजविलेल्या ट्रॅक्टरमधून नेण्यात येणार आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर