शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

टोप येथे महामार्गालगत घरफोडी; गुंगीचा स्प्रे मारून सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:30 IST

ही घटना उघडकीस आल्यानंतर पाटील व परिसरातील नागरिकांनी तातडीने शिरोली  पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. याप्रकरणी वैभव बाळासो पाटील यांनी शिरोली  पोलिस ठाण्यात  चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

शिरोली

कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथे महामार्गाच्या लगत असणाऱ्या एका घरात दरोडा टाकण्यात आला. हे घर वैभव बाळासो पाटील यांचे आहे. त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करत सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घरात झोपलेल्या व्यक्तींच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री १०.३० ते शुक्रवारी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ञ पथक आले होते.  पुणे -बंगळूर महामार्गावर टोप गावच्या पूर्वेला ग्रामपंचायत शेजारी वैभव बाळासो पाटील यांचे घर आहे. गुरुवारी रात्री पाटील यांची आई, भाऊ, आजी सर्व मंडळी झोपी गेले असता चोरट्यांनी घरासमोरील पाळीव कुत्र्यांला गुंगीचे औषध घातले, आणि घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आणि घरात झोपलेल्या लोकांच्या तोंडावर ही गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारुन घरातील तिजोरी उघडून तिजोरीतील दोन तोळे सोन्याचे दागीने, चांदीचे दागिने, तीन मोबाईल फोन, रोख ३० हजार रुपये असा ३ लाख २१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

यावेळी पाटील यांच्या घराशेजारी असलेले नातेवाईक कृष्णात गायकवाड हे पहाटे ३.३० वाजता लघुशंकेसाठी उठले असता त्यांनी घराचा दरवाजा उघडला असल्याचे पाहिले आणि घरात गेलो आणि घरातील लोकांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते गुंगीत होते.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पाटील व परिसरातील नागरिकांनी तातडीने शिरोली  पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. याप्रकरणी वैभव बाळासो पाटील यांनी शिरोली  पोलिस ठाण्यात  चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन श्वानपथकाला पाचारण केले पण श्वानपथक तिथेच घुटमळले, पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.

महामार्गालगत व वस्तीच्या परिसरात अशा प्रकारची गुंगीचा स्प्रे वापरून करण्यात आलेली धाडसी घरफोडी ही गंभीर असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Theft at Top: Robbers use anesthetic spray, steal valuables.

Web Summary : Robbers broke into a house in Top, Kolhapur, using an anesthetic spray on the residents. They stole gold, silver, mobile phones, and cash worth ₹3.21 lakhs. Police are investigating the incident, which has caused fear in the area.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस