कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:19 IST2025-12-19T10:05:48+5:302025-12-19T10:19:02+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलानेच आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
हुपरी:
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील इंग्रोळे कॉर्नरजवळील अल्फा चौकात पहाटे घडलेल्या एका अमानुष घटनेने संपूर्ण हुपरी शहर हादरून गेले आहे. जन्म देणाऱ्या आई-वडिलांवरच पोटच्या मुलाने निर्घृणपणे हल्ला करून दोघांचा जागीच खून केला. या भीषण घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने खळबळ उडाली आहे.
सुनील नारायण भोसले असे सशंयित आरोपीचे नाव आहे.वाटणीच्या वादातून त्याने हा रक्तरंजित प्रकार केल्याची प्राथमिक माहिती असली तरी तो सायंकीक होता आई जिजाबाई नारायण भोसले या चाविला पाणी भरत असताना यांच्यावर मागील बाजूने डोक्यात प्रहार करून, हाताच्या शिरा कापत त्यांना मारण्यात आले. या भयानक दृश्याची साक्षीदार असलेल्या एका महिलेने घाबरून फरशी फेकली, आरडाओरड केली. मात्र पहाटेच्या शांततेत तो आवाज कुणाच्या लक्षात आला नाही.
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
दरम्यान, पुढील खोलीत असलेल्या वडिल नारायण गणपतराव भोसले यांना सगळ्याची कल्पनाच आली नाही. “आई कुठे आहे?” अशी चौकशी केल्यावर सुनीलने “मागे आहे, जा” असे सांगत पाठीमागून डोक्यात दगड घालून काठीने घाव घातला. त्यानंतर वडिलांच्याही हाताच्या शिरा कापून निर्दयपणे हत्या करण्यात आली. काही क्षणांतच दोन जन्मदात्यांचे प्राण गेले.
पहाटेच्या सुमारास चावीला पाणी आल्याने सगळी गल्ली जागी होती आरोपीची दहशतीमुळे त्या घराकडे लोकांचे दुर्लक्ष होते घडलेल्या या घटनेनंतर परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. संताप, शोक आणि भीतीचे वातावरण पसरले. माहिती मिळताच पोलिस प्रशासन, मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. पंचनामा व पुढील तपास सुरू आहे.