शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: क्रिकेट खेळताना वाद, इचलकरंजीत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 12:25 IST

दोघे स्वत:हून पोलिसांत हजर 

इचलकरंजी : येथील जिजामाता मार्केटमध्ये एका तरुणावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. सूरज अशोककुमार राठी (वय ३२, रा. नारायण पेठ) असे जखमी युवकाचे नाव आहे. घटनेनंतर दोघे हल्लेखोर स्वत:हून पोलिसांत हजर झाले. हा हल्ला क्रिकेट खेळताना निर्माण झालेल्या जुन्या वादातून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समजले आहे. सोमवारी भरदिवसा झालेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली.प्रणव मानकर व समर्थ राजकुमार जाधव अशी हल्लेखोरांची नावे आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, सूरज राठी हा जिजामाता मार्केटमधील मुलतानमल बाबुलाल ॲण्ड कंपनी या कापड पेढीवर दिवाणजी म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो पेढी उघडण्यासाठी आला होता. पेढीचे शटर उघडत असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानकपणे कोयत्याने हल्ला केला. लाथा मारत सूरजला खाली पाडले आणि कोयत्याने डोक्यावर वार केला.अचानक झालेल्या या हल्ल्याने भेदरलेल्या सूरज जीव वाचविण्यासाठी समोरच असलेल्या बाबुलाल चोपडा यांच्या माताजी या कापड पेढीत घुसला. त्याचा पाठलाग करत हल्लेखोरही पेढीत घुसले. या ठिकाणी त्याच्यावर पुन्हा कोयत्याने वार केले. यावेळी वार चुकवत सूरज हा पेढीतील बाथरूममध्ये शिरला. दरवाजा लावून घेतल्यामुळे तो बचावला.

सूरज याच्या डोक्यात, दोन्ही हातांवर व खांद्यावर वार झाल्याने पेढीवर ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळीच कोयता टाकून हल्लेखोरांनी पलायन केले. नागरिकांनी राठी यास तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक लॅब पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. घटनेनंतर संशयितांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर राहून कबुली दिली.

घटनास्थळावरील चित्रमाताजी पेढीवर मोठा कोयता, एक घड्याळ, अंगठी, कानातील बाली आणि मोबाइल पडल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी सर्व वस्तू जप्त करून पंचनामा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीichalkaranji-acइचलकरंजी