शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election Voting: गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ-स्वाती कोरी यांच्यात वादावादी, येथील निकालाकडे राज्याचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:33 IST

राष्ट्रवादीविरुद्ध महायुती  

गडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध जनता दल-जनसुराज्य-भाजपा-शिंदेसेना महायुती यांच्यात चुरशीचा दुरंगी सामना झाला. त्यामुळे एकेका मतासाठी शेवटपर्यंत जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे कांही केंद्रावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवले. एका केंद्रावर मंत्री हसन मुश्रीफ आणि जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचीच चर्चा जिल्ह्यात रंगली असून, येथील निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.दुपारी तीनच्या सुमारास साडेतीनच्या सुमारास मंत्री मुश्रीफ हे आपल्या कार्यकर्त्यांसह शहरातील साधना हायस्कूलमधील मतदान केंद्रात आले. त्यांच्या पाठोपाठ जनता दलाच्या माजी नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यादेखील समर्थकांसह गेल्या. दोघांची आमने-सामने भेट होताच ‘मी आलो म्हणून, तुम्ही यावे असे कुठे असते का? असा प्रश्न मुश्रीफांनी केला. आपण मतदानाची माहिती घेतली, असेही त्यांनी सांगितले.

वाचा : मतमोजणी वेटिंगवर.. प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनवर; 'ही' घ्यावी लागणार खबरदारीतथापि, मीदेखील मतदानाची आकडेवारी घेतली. ‘मतदान केंद्रात आम्हाला प्रतिबंध करणारे पोलिस तुम्हाला सोडतात. एकाला एक-दुसऱ्याला दुसरा नियम असतो का? तुम्ही जसे तुमच्या पक्षाचे प्रमुख तशी मी माझ्या पक्षाची प्रमुख आहे’, असे प्रत्युत्तर कोरी यांनी दिले. त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीची चर्चा जिल्हाभर रंगली.सकाळी बॅ. नाथ पै विद्यालयातील केंद्रात मतदान प्रक्रिया सुरू होत असतानाच पहिले मतदान करण्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे उमेदवार बसवराज खणगावे आणि भाजपचे उमेदवार आप्पा शिवणे यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर मुलींचे हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मतदार आणण्याच्या कारणावरून राष्ट्रवादीचे उमेदवार विठ्ठल भमानगोळ आणि शिंदेसेनेचे उमेदवार दुंडाप्पा नेवडे यांचे चिरंजीव विनायक नेवडे यांच्यात वादावादी झाली. या घटनांमुळे संबंधित केंद्राच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Local Body Polls: Mushrif-Kori clash; State eyes Gadhinglaj result.

Web Summary : Gadhinglaj witnessed a fierce battle between NCP and Mahayuti in local body elections. Hassan Mushrif and Swati Kori clashed at a polling booth. Earlier, candidates also argued over voting sequence and voter transport, raising tensions. The state keenly awaits the results.