शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar Death in Plane Crash: मंत्री मुश्रीफांना अश्रु अनावर; शाहू छत्रपती म्हणाले, सगळ्यांसाठी झटणारा महाराष्ट्राचा नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 13:24 IST

अजित पवारांच्या निधनांची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रु अनावर

कोल्हापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. यात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यादुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. अजित पवारांच्या निधनांची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रु अनावर झाले. तर कोल्हापुरातील नेत्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

खासदार शाहू छत्रपती म्हणाले, अजित पवारांचे आणि आमचे जवळजवळ ३० वर्षांचे संबंध होते. एक बहुजन समाजाचे महत्वाचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले होते. गेल्या काही वर्षांत जरी त्यांचे आणि शरद पवारांचे काही मतभेद होते, मात्र ते वैचारिक मतभेद होते. खऱ्या अर्थाने ते सगळे एकच आहेत. सगळ्यांसाठी झटणारा एक महाराष्ट्राचा महत्त्वाचा नेता होता. अर्थव्यवस्थेचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. अशी व्यक्ती गेल्यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. ते रोखठोक नेते होतेच, कुठलीही गोष्ट ते स्पष्टपणे बोलायचे. एके दिवशी त्यांचा मला त्यांचा भेटायला येणार असल्याचा रात्री फोन आला होता. अन् सकाळी ९ वाजता ते येणार होते मात्र सव्वा आठलाच ते आले होते.

एक कर्तृत्ववान नेतृत्व राज्य मुकले - सतेज पाटील

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी दिवस असल्याचे सांगत अजित दादांच्या बद्दल भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाही आहेत. एक कर्तृत्ववान नेतृत्व राज्य मुकले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

वाचा- अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रात ३ दिवसाचा दुखवटा, आज शासकीय सुट्टी जाहीर; CM देवेंद्र फडणवीस गहिवरले

महाराष्ट्र पोरका झाला - धनंजय महाडिक

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर पाहिली. यानंतर देवाकडे प्रार्थना करतो होतो यानंतर दुसरी काही बातमी येवू नये. पण विमानाची दृश्य दाखवली त्यावेळी छातीतील धडधड वाढली अन् काही क्षणात जी बातमी एेकायला नको होती ती समोर आली. अजितदादा निघून गेल्याने महाराष्ट्र पोरका झाला. अतिशय स्पष्ट वक्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. कार्यकर्त्यांवर जिवापार प्रेम करणारे असे दादा स्वप्नात देखील वाटले नव्हेत. महाराष्ट्रात मोठी पोकळीक झाली असून ती कधीही भरुन निघणारी नसल्याच्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

उमेदा नेता गमावला - राजू शेट्टी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाल्याचे एेकले अन् मन सुनं झाल्याची प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्राने उमेदा स्वभावाचा, दिलदार, मोकळा ढाकळ्या स्वभावाचा नेता गमावला. राजकारण, समाजकारण, सहकार अन् राज्याच्या आर्थिकस्थितीची खडानंखडा माहिती असणारा एक अभ्यासू असे नेतृत्व महाराष्ट्राने गमावले. गेल्या दोन दशकामध्ये राज्याच्या राजकारणात अजितदादांचा प्रभाव होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकदा टीकाटिपण्णी होवून सुद्दा व्यक्तिगत स्नेह कायम होता. दिलदार मनाच्या अजितदादाच्या जाण्याने महाराष्ट्र हादरला असल्याचे मत व्यक्त करत शेट्टींनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.

वाचा- अजित पवारांचे विमान उडवणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांना किती अनुभव होता?​​​​​​​

हा अतिशय मोठा धक्का - संजय मंडलिक

माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, हा अतिशय मोठा धक्का मला आणि महाराष्ट्रातल्या सर्व तरुण राजकारणी मंडळींना आहे. अनेकजण त्यांचा आदर्श घेऊन अनेक मंडळी राजकारणात काम करत आहेत. विशेषतः कोल्हापूरशी देखील त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. अनेकवेळा भेटल्यानंतर ते कोल्हापूरच्या आठवणी सांगायचे. अशा नेत्याला राज्याने गमावल्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे कधीही न भरून निघणार नुकसान असल्याचे मत व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar Dies in Plane Crash; Leaders Express Grief

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. Leaders across Maharashtra expressed deep sorrow, remembering Pawar's contributions and impact on the state's development and welfare.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDeathमृत्यूPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकRaju Shettyराजू शेट्टीsanjay mandlikसंजय मंडलिक