शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार ५०० लाभार्थी बोगस

By admin | Updated: August 29, 2015 01:06 IST

‘संजय गांधी’ योजना : पालकमंत्र्यांची माहिती; चौकशी सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजना समितीमधील ‘श्रावणबाळ’सह विविध योजनांचे १७ हजार ५४४ लाभार्थी संभाव्य अपात्रतेच्या यादीत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून, प्रशासनावर दबाव टाकून अरेरावीची भाषा चालू देणार नाही, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता दिला.पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शनच्या निकषांत न बसणाऱ्या लाभार्थ्यांची चौकशी सुरू आहे. याबाबत काहीजण हे सरकार गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतत आहे, अशी टीका करीत आहेत; परंतु आपल्या सरकारचा तसा कोणताही उद्देश नाही; कारण संजय गांधी योजनेतील ‘श्रावणबाळ’सह विविध योजनांकरिता कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने अध्यादेश काढला होता. त्यामध्ये या योजनांमधील पेन्शन घेणाऱ्या लाभार्थ्यांचे दरवर्षी सोशल आॅडिट करून, यामध्ये नियमबाह्य लाभार्थी सापडल्यास त्याला संंबंधित अधिकारी तत्काळ अपात्र करून त्याचे अनुदान बंद करू शकतो, अशी तरतूद होती. त्याशिवाय या अपात्र लाभार्थ्याला कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नव्हती; परंतु याची अंमलबजावणीच न करता इथून मागे प्रशासनावर दबाव आणून नियमबाह्य कामे झाली आहेत. आमच्या सरकारने उलट या अध्यादेशात (पान ७ वर)ांद्रकांतदादा-मुश्रीफ आमने सामनेचार महिन्यांपूर्वी साखर कारखान्यांना पॅकेजची रक्कम मिळावी म्हणून आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यावेळीही या दोघांत जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता पुन्हा संजय गांधी निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांवरुन हे दोघे आमने सामने ठाकले आहेत. या बोगस लाभार्थांबाबत चौकशी सुरू झाल्याने कागल तालुक्यात आंदोलनाचे रान उठले आहे. सरकार गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतत असल्याची टीका सुरु आहे. त्यामुळे याबाबत स्पष्टीकरण करण्यासाठी चंद्रकातदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. कागल तालुक्यात सध्या झुंडशाही सुरू असल्याची टीका करीत सरकारी यंत्रणेवर दबाव आणून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले, येथील तहसीलदार जीव मुठीत धरून काम करीत आहेत. ते माझी बदली गडचिरोलीला करा; पण मी इथे काम करणार नाही, असे म्हणत आहेत. यावरून येथील परिस्थितीचा अंदाज येतो; परंतु आपण सरकारमधील जबाबदार मंत्री या नात्याने सर्व सरकारी यंत्रणेला आश्वस्त करतो की, सरकार आपल्या पूर्ण पाठीशी आहे. जर कोणी अशी अरेरावी व मुजोरीची भाषा करीत असेल तर ती चालू देणार नाही. त्यांना योग्य उत्तर दिले जाईल; परंतु सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही नियमबाह्य काम करू नये; अन्यथा त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारू. कागलमध्ये सर्वाधिक अपात्र लाभार्थीजिल्ह्यातील संभाव्य अपात्र लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक कागल विधानसभा मतदारसंघात ३ हजार ६२५ व त्या खालोखाल कोल्हापूर दक्षिणमध्ये ३ हजार ५११ लाभार्थी आहेत. त्याबरोबर करवीर विधानसभा मतदारसंघात ३ हजार १०९ व भुदरगडमध्ये २ हजार ८१२ लाभार्थी असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. (आणखी वृत्त २)