शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 01:11 IST

प्रवाशांचा सवाल : उर्मटपणाचा कळस, आरटीओ, वाहतूक पाेलिसांचे दुर्लक्ष

- प्रशांत मानेलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ ही सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीतील रिक्षा या सीएनजीवर चालतात. मग ही भाडेदरात वाढ का, असा सवाल प्रवासी करत आहेत. शहरात मीटर पद्धतच संपुष्टात आली आहे. ८० टक्के रिक्षा शेअर पद्धतीने धावतात. काेराेना काळात रिक्षात फक्त दाेनच प्रवाशांना परवानगी असताना अनेक रिक्षाचालक चार प्रवासी बसवून दुपटीने भाडेवसुली करत आहेत. कुणी विचारलेच तर मुजाेरी केली जाते. त्यामुळे ही लूट थांबणार की नाही, असा सवाल प्रवासी करता आहेत.

कल्याण आरटीओ परिक्षेत्रात ४० हजारांहून अधिक रिक्षा आहेत. यातील निम्या रिक्षा कल्याण-डोंबिवली परिसरात आहेत. शेअर रिक्षांचे प्रस्थ वाढण्यास प्रवासीही कारणीभूत आहेत. त्यामुळे रिक्षातील मीटर शोभेची यंत्र बनली आहेत. अनलॉकमध्ये रिक्षा सुरू करून एक किंवा दोन प्रवाशांना परवानगी देण्यात आली होती. असे असताना शेअर रिक्षांमध्ये तीन-चार प्रवासी बसवून भाडे दुप्पट वसूल केले जात आहे. पूर्वी १० रुपये आकारले जायचे. आता प्रत्येकी २० रुपये भाडे घेतले जात आहे. यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांत वाद हाेण्याचे प्रकार वाढले आहेत. 

१ मार्चपासून रिक्षाभाडे तीन रुपयांनी वाढवले. रिक्षा संघटनांनी या भाडेवाढीचे स्वागत केले आहे. पण शेअर रिक्षाच्या भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेअर भाड्यात हाेणारी लूट थांबवावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. रिक्षा सीएनजीवर चालत असल्या तरी सीएनजी दरही आठ रुपयांनी वाढल्याकडे रिक्षा संघटनांकडून लक्ष वेधले जात आहे. एकीकडे मनमानी भाडे आकारले जात असताना दुसरीकडे भाडे नाकारण्याची प्रवृत्तीही कायम आहे. यात प्रवाशांची पुरती फरफट होत असल्याचे चित्र डोंबिवलीच्या पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात सकाळ-संध्याकाळ पाहायला मिळते. आरटीओचे या प्रकारावर कोणतेही नियंत्रण नसल्याने मुजोरी दिवसागणिक वाढत चालली आहे.

पुढाऱ्यांमुळे वाढली चालकांची मुजोरीठाणे :  बेकायदा रिक्षाचालकांचे पेव अनेक शहरांमध्ये फुटले असून, स्थानिक नेते, पुढाऱ्यांचा त्यांना आशीर्वाद असल्याने दिवसेंदिवस मुजाेरी वाढली आहे. रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांची नेहमीच पायमल्ली होताना दिसते. त्यांच्या बेदरकार रिक्षा चालविण्यामुळे अनेक प्रवाशांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. काही शहरांमध्ये अल्पवयीन मुले बिनबाेभाट रिक्षा चालवत आहेत. त्यामुळे बेदरकारपणा वाढून रिक्षा प्रवास धाेकायदायक बनला आहे. याकडे आरटीओ आणि वाहतूक पाेलिसांकडून हाेत असलेला कानाडाेळाही चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबराेबर त्यांच्या टवाळखाेरीलाही प्रवाशांना सामारे जावे लागत आहे. अनेक रिक्षाचालकांकडे परवाना आणि बॅचही नाहीत. अनेक जण गणवेशही घालत नाहीत. अगदी हाफपॅण्टमध्येही फिरतात. स्टॅण्ड साेडून भाडे भरणे, ताेंडात गुटखा, मद्यपान, गांजाचे व्यसन अशी बेशिस्ती वाढली आहे.