आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 12:16 PM2020-02-20T12:16:41+5:302020-02-20T12:23:11+5:30

कधी तुम्ही मेंदूचं ऑपरेशन करताना रूग्ण व्हायोलिन वाजवत असल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. मात्र, अशी एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे.

Viral Video : Woman plays violin during brain surgery to remove tumor | आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल!

आश्चर्य! ब्रेन ट्यूमरची सर्जरी सुरू असताना 'ती' चक्क वाजवत होती व्हायोलिन, व्हिडीओ व्हायरल!

googlenewsNext

म्युझिक आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जातं हे अनेकदा आपण ऐकतो. अनेकदा तुम्हीही म्युझिकमध्ये तल्लीन होण्याचा अनुभव घेतला असेल. पण कधी तुम्ही मेंदूचं ऑपरेशन करताना रूग्ण व्हायोलिन वाजवत असल्याचं ऐकलं नसेल. मात्र, अशी एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. ब्रिटनच्या एका हॉस्पिटलमधील ही घटना असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ब्रिटनमधील महिला डॅगमर टर्नरला ब्रेन ट्यूमर होता. अशात तिच्या मेंदूची सर्जरी सुरू होती. याचदरम्यान तिच्या हातात व्हायोलिन होतं आणि ती सर्जरी करत असताना ते वाजवत होती. डॉक्टरांनी तिला लोकल एनेस्थेशीया दिलं होतं. अशातही ती लेटून व्हायोलिन वाजवत होती. यावरून तिचं व्हायोलिनवरील किंवा म्युझिकवरील प्रेम दिसून येतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या ४० वर्षांपासून ती व्हायोलिन वाजवते.

याचा एक व्हिडीओ समोर आला असून अनेक डॉक्टर्स सर्जरी करण्यात व्यस्त आहेत तर डॅगमर ही व्हायोलिन वाजवण्यात मग्न आहे. या सर्जरीमध्ये सामिल एका डॉक्टरांनी सांगितले की, 'सर्जरी करताना मेंदूतील संवेदनशील भाग योग्यप्रकारे काम करत असल्याची माहिती मिळत होती. ही सर्जरी इतिहास रचत होती, त्यामुळे याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला. डॉक्टरांनी यशस्वीपणे डॅगमरच्या मेंदूतून ट्यूमर काढला.

प्रोफेसर आश्कन म्हणाले की, एखाद्या सर्जरी दरम्यान म्युझिकसोबत एखाद्या रूग्णाचा ट्यूमर काढला असेल असं त्यांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा घडलंय. तेच डॅमगर म्हणाली की, ती १० वय असतानापासून व्हायोलिन वाजवते. ते तिचं पॅशन आहे. काही असो ही खरंच म्युझिकची एक जादू आहे. म्युझिकवर प्रेम करणाऱ्यांना हे नक्कीच समजू शकतं.


Web Title: Viral Video : Woman plays violin during brain surgery to remove tumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.