Video : अचानक नवरीलाच मारू लागला भाऊ; मग, नवरदेवानं केली मंडपातच धू धू धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 12:23 PM2021-07-31T12:23:10+5:302021-07-31T12:27:16+5:30

Viral Video : लग्न समारंभातील व्हिडीओ झाला व्हायरल. या व्हिडीओत भाऊ आपल्या बहिणीला मारताना दिसत आहे.

Viral Video Suddenly brother started beating sister during wedding ceremony husband came and beaten him | Video : अचानक नवरीलाच मारू लागला भाऊ; मग, नवरदेवानं केली मंडपातच धू धू धुलाई

Video : अचानक नवरीलाच मारू लागला भाऊ; मग, नवरदेवानं केली मंडपातच धू धू धुलाई

Next
ठळक मुद्देलग्न समारंभातील व्हिडीओ झाला व्हायरल. या व्हिडीओत भाऊ आपल्या बहिणीला मारताना दिसत आहे.

लग्न समारंभ म्हटलं की निरनिराळ्या परंपरा आल्याच. लग्न समारंभातील व्हिडीओही पाहण्यासारखे असतात. देशात अनेक ठिकाणी लग्नसमारंभाच्या परंपरा निरनिराळ्या असल्याचंही आपल्याला माहित आहे. लग्न समारंभातील निरनिराळे व्हिडीओ आपण व्हायल होताना पाहतो. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु यामध्ये लग्नसमारंभात बहिण आणि भावाच्या भांडणाची परंपरा आहे. 

दरम्यान, लग्नकार्य उरकल्यानंतर पुढील उर्वरित कार्यक्रम सुरू असल्याचं यात दिसत आहे. इतक्यात वधूचा भाऊ तिला हाती असलेल्या एका फांदीनं मुलीला मारण्यास सुरूवात करतो. सुरूवातीला तो तिला हळू मारताना दिसत आहे. परंतु अचानक तो तिला जोरात मारण्यास सुरूवात करतो.


जोरात मारण्यास सुरूवात केल्यानंतर त्या ठिकाणी असलेली एक महिला त्याला थांबवण्यासाठी पुढे येते. परंतु तो थांबत नसल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर नवरा पुढे नवराच त्या दोघांच्या मध्ये येतो आणि नवरी मुलीच्या भावाच्या कानशिलात लगावताना तो या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

Web Title: Viral Video Suddenly brother started beating sister during wedding ceremony husband came and beaten him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app