शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टेक्नॉलॉजिया! कपड्यांप्रमाणे आता माणसांचीही 'धुलाई' होणार; 'या' देशाने आणली जगातली पहिली 'ह्युमन वॉशिंग मशीन' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:57 IST

'ह्युमन वॉशिंग मशीन' आता अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे आणि तिची लोकप्रियता पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जगात टेक्नॉलॉजीमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या जपानने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारा शोध लावला आहे. यावेळी रोबोट किंवा एआयमुळे नव्हे, तर माणसांना धुण्यासाठी बनवलेल्या एका वॉशिंग मशीनमुळे जपान चर्चेत आहे. ही 'ह्युमन वॉशिंग मशीन' आता जपानमध्ये अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे आणि तिची लोकप्रियता पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जगामध्ये पहिल्यांदाच अशी व्यावसायिक 'ह्युमन वॉशर' मशीन बाजारात आली आहे, जी तंत्रज्ञान आणि आरोग्याच्या दृष्टीने एक अद्भुत संकल्पना आहे.

काय आहे ही 'ह्युमन वॉशर' मशीन?

जपानी कंपनी 'सायन्स'ने ही खास मशीन बाजारात आणली आहे. एका हाय-टेक स्पा आणि वॉशिंग मशीनचे हे एकत्रित स्वरूप आहे. वापरकर्ता एका पॉडसारख्या चेंबरमध्ये आत झोपतो. झाकण बंद झाल्यावर मशीन स्वयंचलितपणे संपूर्ण शरीर स्वच्छ करते. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी कपड्यांच्या वॉशिंग मशीनसारखी आहे, फक्त यात 'स्पिन मोड' नसतो. शरीराची धुलाई होत असताना, पार्श्वभूमीवर मन शांत करणारे संगीत ऐकायला मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही मशीन केवळ शरीरच नाही, तर 'आत्म्यालाही' शुद्ध करते!

१९७०च्या संकल्पनेचे आधुनिक रूप

हा शोध अचानक लागलेला नाही. १९७० मध्ये ओसाका एक्सपोमध्ये दाखवलेल्या एका संकल्पनेचे हे आधुनिक आणि सुधारित रूप आहे. कंपनीचे अध्यक्ष लहानपणी या मशीनमुळे प्रेरित झाले होते आणि आता दशकानंतर त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

आरोग्यावरही ठेवते लक्ष!

या मशीनची एक खास गोष्ट म्हणजे, ती केवळ शरीर स्वच्छ करत नाही, तर आरोग्याची देखरेख देखील करते. ही मशीन वापरकर्त्याचे हृदयाचे ठोके, शरीराचे इतर महत्त्वाचे सिग्नल आणि आरोग्यविषयक प्रतिक्रिया रिअल-टाइममध्ये ट्रॅक करते.

किंमत ६० मिलियन येन; फक्त ५० युनिट्स!

ओसाकामध्ये झालेल्या वर्ल्ड एक्सपोमध्ये या मशीनचा प्रोटोटाइप पाहण्यासाठी २.७ कोटी लोकांनी भेट दिली होती आणि याची लांबच लांब रांग लागली होती.ओसाका येथील एका हॉटेलमध्ये ही पहिली मशीन बसवण्यात येत आहे. हॉटेलचे पाहुणे ही सेवा वापरू शकतील. जपानची मोठी इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन 'यामादा डेन्की' देखील ही मशीन आपल्या स्टोअरमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून लोक ती पाहू शकतील आणि अनुभव घेऊ शकतील.

कंपनीने या मशीनचा क्रेझ वाढवण्यासाठी केवळ ५० युनिट्स बनवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका युनिटची किंमत जवळपास ६० मिलियन येन म्हणजेच सुमारे ३.३७ कोटी रुपये इतकी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Japan Introduces World's First Human Washing Machine: A Technological Marvel

Web Summary : Japan has launched the world's first 'Human Washing Machine,' a high-tech spa pod that cleans the body and monitors health. Inspired by a 1970s concept, the machine offers relaxation and tracks vital signs. Limited to 50 units, it costs approximately ₹3.37 crore.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJapanजपानtechnologyतंत्रज्ञान