आधीच Gas टंचाई, त्यात तुमच्याकडे Expiry Date संपलेला सिलिंडर आला का? कसे कळेल? पाहा, सोपी ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:36 IST2026-03-17T14:36:47+5:302026-03-17T14:36:47+5:30

Gas Cylinder Expiry Date Check Trick: तुमच्या घरातील सिलिंडरची Expiry Date उलटून गेली असेल तर त्याचा वापर करू नये.

lpg gas shortage already at peak did you get a cylinder with an expired date know how do you know see a simple trick | आधीच Gas टंचाई, त्यात तुमच्याकडे Expiry Date संपलेला सिलिंडर आला का? कसे कळेल? पाहा, सोपी ट्रिक

आधीच Gas टंचाई, त्यात तुमच्याकडे Expiry Date संपलेला सिलिंडर आला का? कसे कळेल? पाहा, सोपी ट्रिक

Gas Cylinder Expiry Date Check Trick: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलपुरवठ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशवासीयांना दिलासा दिला आहे. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, LPG आणि CNGचा पुरवठा १०० टक्के सुरळीत सुरू आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. असे असले तरी देशभरात अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. यातच सर्व अडथळे पार करून तुमच्या घरी आलेल्या गॅस सिलिंडरची मुदत संपली नाही ना, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आणि आवश्यक ठरत आहे. 

बहुतेक करून बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी केली ती, त्याची Expiry Date तपासायची अनेकांना सवय असते. सजग ग्राहक आवर्जून या गोष्टी तपासत असतात. परंतु, गॅस सिलिंडर घेताना ते अनेकदा विसरतात की, जर कालबाह्य झालेला सिलिंडर वापरला गेला तर गॅस गळती किंवा आग किंवा स्फोट यासारख्या गंभीर घटनांचा धोका वाढू शकतो. घरात वापरला जाणारा सिलिंडर सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गॅस सिलिंडरची Expiry Date सहज तपासता येते. 

सिलेंडरच्या वैधतेशी संबंधित माहिती त्याच्या वरच्या भागात बनवलेल्या लोखंडी पट्टीवर लिहिलेली असते. आपण अनेकदा सिलिंडरवर A28, B29, C26 किंवा D27 सारखे कोड पाहिले असतील. हे कोड सिलिंडरची मुदत संपण्याची किंवा चाचणीची तारीख दर्शवितात. या कोडमध्ये लिहिलेली अक्षरे महिना किंवा तिमाही दर्शवितात, तर त्यानंतर लिहिलेली संख्या वर्ष दर्शविते. 

सिलिंडरवर लिहिलेल्या प्रत्येक अक्षराचा अर्थ वेगळा असतो. यामध्ये ‘A’ म्हणजे जानेवारी ते मार्च, ‘B’ म्हणजे एप्रिल ते जून, ‘C’ म्हणजे जुलै ते सप्टेंबर आणि ‘D’ म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबर. या अक्षरांनी लिहिलेली संख्या सिलिंडर वैध मानली जाते तोपर्यंत वर्ष दर्शविते. उदाहरणार्थ, जर एखाद्या सिलिंडरवर D27 लिहिले असेल तर याचा अर्थ असा आहे की सिलिंडर २०२७ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान वैध आहे. अशा प्रकारे, जर सिलिंडरवर B29 लिहिले असेल तर ते एप्रिल ते जून २०२९ पर्यंत वापरासाठी वैध असेल.

दरम्यान, गॅस सिलिंडर जास्त दाबावर बराच काळ गॅस साठवून ठेवतो. अशा परिस्थितीत, जर कालबाह्य झाल्यानंतरही सिलिंडर वापरला गेला तर गॅस गळती किंवा स्फोट होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सिलिंडरची मुदत संपणे किंवा चाचणीच्या तारखेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या घरातील सिलिंडरने Expiry Date ओलांडली असेल तर त्याचा वापर करू नये. तातडीने गॅस एजन्सी किंवा वितरकाला कळवावे आणि सिलिंडर बदलण्यास सांगावे. सिलिंडरचे सील, वजन आणि Expiry Date डिलिव्हरीच्या वेळी तपासणे केव्हाही योग्य ठरते.

 

Web Title : गैस सिलेंडर की एक्सपायरी डेट: सुरक्षा के लिए आसानी से जांचें।

Web Summary : ऊपरी रिंग पर एक्सपायरी डेट की जांच करके गैस सिलेंडर की सुरक्षा सुनिश्चित करें। A28 जैसे कोड वैधता दर्शाते हैं; A का अर्थ जनवरी-मार्च है, जिसके बाद वर्ष आता है। एक्सपायर्ड सिलेंडरों से रिसाव या विस्फोट का खतरा होता है, इसलिए यदि आपका सिलेंडर एक्सपायर्ड है तो तुरंत गैस एजेंसी से संपर्क करें।

Web Title : Gas Cylinder Expiry Date: Check it easily for safety.

Web Summary : Ensure gas cylinder safety by checking the expiry date on the upper ring. Codes like A28 indicate validity; A means January-March, followed by the year. Expired cylinders risk leaks or explosions, so contact your gas agency immediately if yours is past its date.