पायांचे फोटो विकून मोठी कमाई करताहेत काही लोक, भारतात हे कायदेशीर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:00 IST2026-04-16T15:46:37+5:302026-04-16T16:00:51+5:30

Selling Feet Photos : पायांचे फोटो विकून लोक कशाप्रकारे कमाई करत आहेत आणि काय असं करणं भारतात कायदेशीर आहे.

How people earning from selling legs photo, Is it legal in India | पायांचे फोटो विकून मोठी कमाई करताहेत काही लोक, भारतात हे कायदेशीर आहे का?

पायांचे फोटो विकून मोठी कमाई करताहेत काही लोक, भारतात हे कायदेशीर आहे का?

Selling Feet Photos : डिजिटल युगात जसा भरभर बदल झाला, तसे या युगात कमाईची माध्यमे देखील बदललीत. लोक सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून देखील वेगळ्या पद्धतीने पैसे कमाऊ लागले आहेत. कमाईचे असे काही ट्रेंड हल्ली समोर आले आहे, जे विचित्र नक्कीच वाटू शकतात. पण हळूहळू कॉमन होत चालले आहेत. कुणी घाम विकून पैसे कमावत आहेत, तर कुणी आणखी काही करून. यातीलच एक म्हणजे पायांचे फोटो विकून कमाई करण्याचा ट्रेंड. आपल्याला विश्वास बसणार नाही पण अलिकडे लोक पायांचे फोटो विकूनही कमाई करू लागले आहेत. आज आपण हेच पाहणार आहोत की, पायांचे फोटो विकून लोक कशाप्रकारे कमाई करत आहेत आणि काय असं करणं भारतात कायदेशीर आहे.

काय आहे हा नवा ट्रेंड?

इंटरनेटवर असे बरेच लोक आहेत, जे दावा करत आहे की, ते केवळ पायांचे फोटो विकून चांगले पैसे कमावत आहेत. काही लोक याला सुट्ट्यांसाठी फंड करणे, शॉपिंग किंवा भाडे देण्याचं माध्यम सांगत आहेत. हा एक खासप्रकारचा डिजिटल साइड हसल बनला आहे, ज्यात खासप्रकारच्या फोटोंची डिमांड केली जाते.

भारतात हे कायदेशीर की बेकायदेशीर?

भारतात पायांचे फोटो विकणं बेकायदेशीर नाही. पण यासाठी काही अटी गरजेच्या आहेत. कन्टेन्ट तयार करणारी व्यक्ती वयस्क असली पाहिजे. फोटो स्वत:चा असला पाहिजे. कन्टेन्ट आक्षेपार्ह नसावा. तसेच देशात थेटपणे असा कोणताही कायदा नाही, जो अशाप्रकारे फोटो विकण्यावर बंदी घालू शकेल. आयटी अॅक्ट २००० आणि इंडियन पीनल कोडनुसार, अश्लील किंवा आक्षेपार्ह कन्टेन्ट पोस्ट करणं गुन्हा मानला जातो. कन्टेन्ट काय आणि कसा आहे त्यावर हे अवलंबून असेल.

लोक कुठे विकतात पायांचे फोटो?

भारतात अशाप्रकारच्या कन्टेन्टसाठी कोणताही खास प्लॅटफॉर्म नाही. पण बरेच लोक इंटरनॅशनल वेबसाइट आणि सोशल मीडियाचा यासाठी वापर करतात. तसेच यातून होणाऱ्या कमाईबाबत सांगायचं तर कमाई पूर्णपणे आपण किती कन्टेन्ट बनवता, त्याची क्वालिटी कशी आहे आणि आपला ऑडिअन्स किती, यावर अवलंबून असतो. काही लोक दर महिन्यात ५ हजारांपर्यंत कमाई करू शकतात तर काही लोक यातून महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त कमाई केल्याचा दावा करतात. म्हणजेच काय तर सगळ्यांसाठीच एकसारखी कमाई नसते.

कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल?

हे काम जेवढं सोपं वाटतं, तेवढं सोपं नसतं. यात अनेक प्रकारचे धोकेही असतात. जसे की, प्रायव्हसीचा धोका आणि ओळख उघड होण्याची भीती असते. त्याशिवाय अकाउंट हॅक किंवा कन्टेन्ट लीक होण्याची शक्यता, सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि अनावश्यकपणे कुणाच्या लक्षात येण्याचा धोका राहतो. त्याशिवाय प्लॅटफॉर्मच्या नियमांमुळे अकाउंट बंद होण्याचा धोका राहतो.

Web Title : पैरों की तस्वीरें बेचना: भारत में कमाई का नया तरीका?

Web Summary : पैरों की तस्वीरें बेचना एक उभरता हुआ डिजिटल चलन है। भारत में यह अवैध नहीं है यदि सामग्री अश्लील नहीं है, और व्यक्ति वयस्क है। कमाई सामग्री की गुणवत्ता और दर्शकों के आधार पर भिन्न होती है। जोखिमों में गोपनीयता भंग और ट्रोलिंग शामिल हैं।

Web Title : Selling feet photos: A new way to earn in India?

Web Summary : Selling feet pictures is a rising digital trend. It's not illegal in India if the content isn't obscene, and the person is an adult. Earnings vary based on content quality and audience. Risks include privacy breaches and trolling.