शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सगळ्यात महागडे अश्रू, जे मनुष्यांना देतील जीवनदान अन् सापांसाठी ठरतील कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:27 IST

World's Most Expensive Tear: अश्रू विकले जातात किंवा त्यांना मोठी किंमत मिळते, असं कुणी सांगितलं तर सहजपणे विश्वास बसणार नाही. मात्र, असं होत आहे. पण ही किंमत मनुष्यांच्या नाही तर उंटाच्या अश्रूंना मिळत आहे. 

World's Most Expensive Tear: दु:खं झालं किंवा आनंद झाला तर डोळ्यातून अश्रू येतात. अश्रू येणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. अश्रू निघाल्यानं डोळे साफ होतात आणि मन हलकं होतं. पण अश्रू विकले जातात किंवा त्यांना मोठी किंमत मिळते, असं कुणी सांगितलं तर सहजपणे विश्वास बसणार नाही. मात्र, असं होत आहे. पण ही किंमत मनुष्यांच्या नाही तर उंटाच्या अश्रूंना मिळत आहे. 

राजस्थानची शान असणारे उंट आता केवळ शेतीच्या कामासाठी किंवा ओझं वाहण्यासाठी राहिले नाहीत. कारण बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) च्या एका रिपोर्टमधून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, उंटाचे अश्रू आणि त्यांच्या  इम्यून सिस्टीममधून मिळणारे अ‍ॅंटी-बॉडी आता मनुष्यांचा जीव वाचण्यासाठी कामात येऊ शकतात. खासकरून सापाच्या विषाच्या उपचारात.

NRCC च्या अभ्यासकांनी उंटांना सॉ-स्केल्ड वायपर या विषारी सापाच्या विषानं इम्युनाइज करण्यात आलं. त्यानंतर उंटाचे अश्रू आणि रक्तातून काढण्यात आलेल्या अ‍ॅंटीबॉडीज टेस्ट करण्यात आल्या. याचा प्रभाव सकारात्मक दिसून आला. या अ‍ॅंटीबॉडीज रक्त वाहणं आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया सामान्य करण्यात फायदेशीर दिसल्या.  

दरवर्षी मरतात ५८,००० लोक

भारतात दरवर्षी ५८ हजारांपेक्षा जास्त लोक सापाच्या विषानं आपला जीव गमावतात. जवळपास १.४ लाख लोक अपंग होतात. हे प्रमाण जगात सगळ्यात जास्त आहे. गाव आणि खेड्यापाड्यांमध्ये योग्य वेळेवर उपचार मिळत नसल्यानं हे जीव जातात. अशात उंटातून मिळत असलेला हा नवा उपाय स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.

हा रिसर्च केवळ उपचारासाठी महत्वाचा नाही तर उंट पालक शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूरसारख्या भागांमधील उंट पालक उंटाच्या अश्रूचे आणि रक्ताचे सॅम्पल देण्याच्या बदल्यात ५ हजार ते १० हजार रूपये महिना कमाई करत आहेत.

उंट आता केवळ वाळवंटात ओझं वाहणारा प्राणी नाही तर जीवनदान देणारा प्राणी ठरत आहे. या शोधानं ग्रामीण भागात विकास आणि स्थानिक जीवांचं महत्वही दाखवलं आहे. येत्या काळात उंट हजारो भारतीयांचा जीव वाचवू शकतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्यResearchसंशोधन