शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी मध्ये विष्णुयाग महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 18:08 IST

फैजपूर : येथे २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान भव्य विष्णुयाग महोत्सव व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन केले असून हा ...

फैजपूर : येथे २६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान भव्य विष्णुयाग महोत्सव व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन केले असून हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे.याकरिता सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी कार्यकर्ते यांची सभा नुकतीच प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व प. पू. महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांच्या उपस्थितीत झाली. सभेत समितीचे सचिव व मसाका संचालक नरेन्द्र नारखेडे यांनी आढावा मांडला.२६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी याकाळात २७ कुंडी विष्णुयाग होईल. दररोज गाथा पारायण व दुपारी ३ ते ५ प. पू.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे योगी पावन मनाचा याविषयावर प्रवचने होतील. रात्री आळंदी व पंढरपूर येथील थोर कीर्तनकार यांची कीर्तने होईल. या महोत्सवात महाराष्ट्रातील थोर साधू व संत तसेच नाशिक, त्रंबकेश्वर, काशी ,चेन्नई व फैजपुर येथील ब्राह्मण उपस्थित राहणार आहे. प. पू. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे काल्याचे कीर्तनाच्या कार्यक्रमाची सांगता होईल. या महोत्सवाचे आयोजन प. पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे प्रमुख उपस्थितीत होईल. मार्गदर्शन प. पू. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व प. पू. महामंडलेश्वर पुरुषोत्तम महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रमास प. पू. महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज यांनी खंडोबा मंदिराचा हॉल व आवार विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. सभेला उपस्थित भाविक व कार्यकर्ते यांनी देणगी जाहीर करून कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडण्याची संकल्प केला. यज्ञासाठी भाविकांनी नांवे नोंद करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. चोलदास पाटील, विजय परदेशी, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे , योगेश भावसार, डॉ गणेश भारबे, उमेश चौधरी, सुनील पाटील, नितीन महाजन, किशोर गुजराती, हिरामण भिरुड, पंडित कोल्हे, सुशील जैसवाल, हेमा भंगाळे, राहुल साळी, काशिनाथ वारके, किशोर कोल्हे, प्रवीण महाराज यांची उपस्थिती होती.