शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांकडून सव्वादोन लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 23:09 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे रावेर रेल्वेस्थानकावर ‘बस रेड तिकीट चेकिंग’ या कारवाई सत्रांतर्गत फुकट प्रवास करणाऱ्यांकडून पथकाने बुधवारी दोन लाख २४ हजाराचा दंड वसूल केला.

ठळक मुद्देरावेर स्टेशनवर कारवाई‘बस रेड तिकीट चेकिंग’ मोहीम

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागातर्फे रावेर रेल्वेस्थानकावर ‘बस रेड तिकीट चेकिंग’ या कारवाई सत्रांतर्गत फुकट प्रवास करणाऱ्यांकडून पथकाने बुधवारी दोन लाख २४ हजाराचा दंड वसूल केला.वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा व सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक नियुक्त होते. यात ७ रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच तीसपेक्षा जास्त तिकीट निरीक्षकांचा सहभाग होता. रेल्वेस्थानकावर राबवण्यात तपासणी अंतर्गत ४०६ विनातिकीट प्रवास करणाºया फुकट्या प्रवाशांवर तसेच सामान्य तिकिटावरून आरक्षित डब्यामध्ये, एसी डब्यामध्ये प्रवेश करणारे क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाºया प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. याद्वारे दोन लाख २४ हजार ८२५ दंड या प्रवाशांना ठोठावण्यात आला. या मोहिमेत मुख्य तिकीट निरीक्षक वाय. डी. पाठक, एटीएस स्काँड, सजग स्कॉड, ओडी स्टाफ व अन्य तिकीट निरीक्षक, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.काहींनी ठोकली धूमरावेर स्टेशनवर गाडी थांबवून ही तपासणी मोहीम अचानक सुरू झाल्याने प्रवासी वर्गाची धावपळ उडाली. प्रवासाचे तिकीट न काढलेल्या काही प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरून धूम ठोकली तर आरक्षणाच्या डब्यातील काही जणांनी विरूद्ध दिशेने उतरून पळ काढला.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ