शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या पेपरला पडला कॉप्यांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:20 IST

बंदोबस्त नावालाच : किन्ही हायस्कूलसह डी़एस़हायस्कूलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणात परीक्षा

भुसावळ : दहावी परीक्षेला मंगळवारपासून कडक पोलीस बंदोबस्तात शहरातील आठ केंद्रांवर प्रारंभ झाला असला तरी जामनेर रोडवरील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अक्षरश: कॉप्यांचा पाऊस पडला़ बंदोबस्तावरील यंत्रणेने बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला़दरम्यान, तालुक्यातील किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलसह शहरातील डी़ एस़ हायस्कूलमध्ये तीनही तास व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले तर बैठे पथक थांबून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये  मोठी खळबळ उडाली़विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली कॉपीदहावी परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला़ पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर असला तरी शहरातील बहुतांश केंद्रांवर विद्यार्थ्यांची सर्रास कॉपी सुरू होती तर कॉपी पुरवण्यासाठी थेट दुसरा व तिसरा मजलादेखील गाठण्यात आला़ शहरातील जामनेर रोडवरील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये तर कॉपी पुरवणाºयांची यात्राच भरली होती़ संरक्षण कुंपणाची भिंत ओलांडून थेट विद्यार्थ्यांच्या बाकापर्यंत कॉपी पोहोचली. विशेष बंदोबस्तावर पोलीस व होमगार्ड यंत्रणा असले तरी त्यांनीदेखील कॉपीला एकप्रकारे मूक प्रोत्साहन दिल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला़दरम्यान, यावल रोडवरील डी़एस़हायस्कूलमध्येदेखील विद्यार्थ्यांनी वाचनालयाच्या छतावरील थेट दुसºया मजल्यावरील विद्यार्थ्यापर्यंत कॉपी पुरवल्याचे चित्र दिसून आले़ दहावी परीक्षेला शहरातील तब्बल ३० विद्यार्थ्यांनी दांडी मारली़ चारही माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे़ मराठीसाठी दोन हजार ७२८ पैकी दोन हजार ७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २४ विद्यार्थी गैरहजर राहिले़ हिंदीसाठी २८४ पैकी २८३ विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला तर एक विद्यार्थी अनुपस्थित राहिला़ उर्दूसाठी ५४७ पैकी ५४४ विद्यार्थी उपस्थित होते तर तीन विद्यार्थ्यांनी दांडी मारली तसेच सिंधी विषयासाठी ६० पैकी केवळ ५८ विद्यार्थी उपस्थित राहिले व दोन विद्यार्थ्यांनी दांडी मारली़