शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

असुरक्षित कर्जावर ना बोझा ना कर्जदारांच्या मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेतील असुरक्षित कर्जाची रक्कम जवळपास १३५ कोटींच्या घरात ...

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अर्थात बीएचआर संस्थेतील असुरक्षित कर्जाची रक्कम जवळपास १३५ कोटींच्या घरात असून या कर्जाबाबत बोझा बसविला गेला नाही की संबंधित कर्जदारांचा शोध घेतला गेला नाही. यामुळे संस्थेची वसुली होऊ शकली नाही व यासाठी अवसायकांनी पाठपुरावादेखील केला नसल्याचा आरोप केला जात आहे.

बीएचआर संस्थेतील अपहार व इतर कारणांमुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावात चौकशी करण्यात आली. या प्रकारामुळे अवसायकाचा कारभार समोर येत असून संस्था अवसायनात गेल्यानंतर कर्जाच्या वसुलीसाठी आवश्यक बाब होऊ शकलेल्या नाही. लेखापरीक्षणास टाळाटाळ करण्यासह अवसायकांनी असुरक्षित कर्जदारांच्या मालमत्तादेखील शोधल्या नाही.

कोणतेही तारण नसताना नातेवाईकांना कर्जाचे वाटप

बीएचआर संस्थेचे जे असुरक्षित कर्ज आहे, त्याचा वितार केला तर ते संचालक व त्यांच्या नातेवाईकांनाच वाटप केले गेले आहे. यामध्ये ४५ मोठे कर्जदार यासाठी कोणतेही तारण नाही. त्यामुळे हे कर्ज असुरक्षित असून ज‌वळपास हे कर्ज १३५ कोटी रुपयांच्या घरात आहे.

संचालकांनी केले वाटप, अवसायकांनी केले दुर्लक्ष

कोणतेही तारण न घेता संचालकांनी एक प्रकारे कोट्यवधींच्या कर्जाची खैरातच वाटप केल्याचे चित्र आहे. संचालकांनी हे कर्ज वाटप केले असले तरी संस्था अवसायनात गेल्यानंतर या असुरक्षित कर्जधारकांचा अवसायकांनी शोध घेणे गरजेचे होते. मात्र अवसायकांनी तसे न करता केवळ पावत्यांचाच शोध घेतला व टक्केवारीवर भर दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शोधच नसल्याने बोझाही नाही

संस्थेचे जे असुरक्षित कर्ज आहे, त्या कर्जदारांचा शोध घेऊन त्यावर बोझा बसविणे गरजेेचे होते. अवसायकाला हे अधिकार असले तरी त्याकडे दुर्लक्ष झाल्याने असुरक्षित कर्जाचा शोध घेतलाच नाही, त्यामुळे अशा कर्जदारांच्या मालमत्तांवर बोझाही बसविला गेला नाही. यामुळे कर्जदारही निश्चिंत झाले. मात्र ठेवीदार वाऱ्यावर सोडले गेले. ज्यांनी पावत्या देऊन टक्केवारी मान्य केली, त्यांना मोेठा आर्थिक भूर्दंड यामुळे सहन करावा लागला.

लेखापरीक्षण नसल्याने त्रुटी नाही व गुन्हेही दाखल नाही

अवसायकाने संस्थेचे लेखापरीक्षण करण्याकडे दुर्लक्ष केल्याने कर्जाबाबत काय घोळ‌ आहे तसेच वसुली किती व ठेवीदारांना किती ठेवी दिल्या गेल्या हे स्पष्ट होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील कारवाईदेखील होऊ शकलेली नाही. संस्थेच्या कारभाराबाबत काही जणांनी माहिती मागितली असता अवसायक जितेंद्र कंडारे यांनी सांगितले होते की, लेखापरीक्षणात काही आक्षेप, त्रुटी आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही गेल्या पाच वर्षात घडले नाही. त्यामुळे संस्थेच्या ठेवी वसूल होतील तरी कशा व ठेवीदारांना ठेवी कशा मिळतील, असा प्रश्न अवसायक आल्यानंतरही कायम राहिला.