शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस लग्न लावणाºया टोळीतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 01:12 IST

धरणगाव तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी आचल अजयराव देशमुख हिच्याशी बोगस लग्न लावून देवून पोबारा करण्याचा करणाºया नागपूरच्या टोळीतील दोघांना धरणगाव पोलिसांनी नागपूर येथून अटक करून आणले.

ठळक मुद्देसबजेलला रवानगीधरणगाव पोलिसांनी नागपुरात घेतले ताब्यात

धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील बोरगाव येथील तरुणाशी आचल अजयराव देशमुख हिच्याशी बोगस लग्न लावून देवून पोबारा करण्याचा करणाºया नागपूरच्या टोळीतील दोघांना धरणगाव पोलिसांनी नागपूर येथून अटक करून आणले. त्यांना दि.२० रोजी धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची सबजेलला रवानगी करण्यात आली आहे. या टोळीतील म्होरक्या राजू बोपचे हा मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.गेल्या दोन महिन्यांपूर्वी रवींद्र सुरेश पाटील रा.बोरगाव, ता.धरणगाव याच्याशी नागपूरच्या काही दलालांनी आचल अजयराव देशमुख रा.नागपूर हिच्याशी लग्न लावून दिले होते. मात्र दोन दिवसातच आचलने पळ काढण्याच्या प्रयत्न केल्याने या लग्नात दलालांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने या घटनेसंदर्भात रवींद्र सुरेश पाटील रा.बोरगाव याने दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणूक केल्याप्रकरणी आचल अजयराव देशमुख रा. नागपूर तसेच राजू बोपचे, अंकुश देवीलाल पटोले, निशांत देवीलाल पटोले यांच्याविरुध्द भादंवि ४२०, ४९५, ४१७, २९४, ३२३, ३५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा आचलला अटक करण्यात आली होती. १५ दिवसांनंतर तिची जामिनावर मुक्तता झाली होती.१९ रोजी तपास अधिकारी सपोनि पवन देसले, हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.खुशाल पाटील व ठाकरे यांनी अंकूश देवीलाल पटोले व निशांत देवीलाल पटोले यांना रा.जैताला, नागपूर येथून अटक केली. या दोघांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश एस.डी.सावरकर यांनी त्यांना न्यायालयीन कस्टडी सुनावली. त्यामुळे या दोघांची सबजेलला रवानगी करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुख्य आरोपी राजू बोपचे हा हाती लागावा यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.रॅकेट शोधावेज्यांच्यामुळे हे बिंग उघडकीस आले ते बोरगावचे सर्व ग्रामस्थ आजही उत्सुकतेने न्यायालयात थांबून होते. या प्रकरणातील मुख्य आरोपींचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणावे, अशी मागणी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जनाबाई भगवान पाटील, पप्पू पाटील, माजी सरपंच भालचंद्र मुन्ना पाटील, विकी पाटील, विजय पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDharangaonधरणगाव