धक्कादायक! चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 18:08 IST2022-09-09T18:05:34+5:302022-09-09T18:08:46+5:30

चाळीसगाव येथे वीज पडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे. 

A father and son have died due to lightning strikes in Chalisgaon | धक्कादायक! चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू

धक्कादायक! चाळीसगावात अंगावर वीज पडून बापलेकाचा दुर्देवी मृत्यू

जिजाबराव वाघ
चाळीसगाव (जळगाव)
: शेतात काम करण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा वीज कोसळून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना चाळीसगाव तालुक्यातील न्हावे येथे शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली. शेतात काम करणाऱ्या इतर महिला बचावल्या आहेत. आबा शिवाजी चव्हाण ( ४५)  आणि दीपक आबा चव्हाण अशी या मृत बापलेकांची नावे आहेत. 

शुक्रवारी दुपारी २ वाजता अचानक विजांचा कडकडाट सुरु होऊन पावसालाही सुरुवात झाली. आबा चव्हाण आणि त्यांचा मुलगा दीपक व पत्नी इतर महिलांसोबत सकाळीच शेतात कपाशीला खत देण्यासाठी गेले होते. दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने ते शेवग्याच्या झाडाखाली थांबले. याचवेळी त्यांच्यावर वीज कोसळली. यात बापलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. बाकिच्या महिला थोडक्यात बचावल्या असून ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

एकाच दिवशी दोन दुर्घटना
चाळीसगावात आज एकाच दिवशी दोन दुर्घटना घडल्या आहेत. चाळीसगावातीलच खडकी बु. येथे डोहात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सौरव सचिन मोरे (वय १७) याचा बुडून मृत्यू झाला. तर वाघळी येथे वीज पडल्यामुळे रमेश बाबुराव पाटील यांच्या मालकीचा  बैल ठार झाला आहे.


 

Web Title: A father and son have died due to lightning strikes in Chalisgaon