शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात ४० किलो गांजा जप्त; पंचायत समिती सदस्याच्या पतीसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 09:53 IST

गांजाची किंमत ६ लाख असून ,४ लाखाची चारचाकी व ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

- संजय पाटील

जळगाव : एका चारचाकीतून  ४० किलो गांजा नेणाऱ्या  कासोदा येथील पंचायत समिती सदस्याच्या पतीसह एरंडोल येथील तिघांना  पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून गांजा , मोटरसायकल व चार चाकी असा साडे दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई चोपडा - धरणगाव रस्त्यावर  करण्यात आली.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,एपीआय राकेश परदेशी , हेकाॕ. किशोर पाटील , हेकाॕ. मिलिंद भामरे , हेकाॕ. मधुकर पाटील १२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा धरणगाव रस्त्यावर  पेट्रोलिंग करीत होते.  मोटरसायकलने येणाऱ्या इसमाच्या संशयित हालचालींवरून त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याचे नाव सतीश बापू चौधरी असे सांगितले.  त्यामागून चार चाकी वाहन आले. त्याची तपासणी केली असता त्यात ३९ किलो ५०० ग्राम  गांजा  आढळून आला. यात चालक आकाश रमेश इंगळे (रा.मरीमाता नगर,  एरंडोल) व कासोदा येथील शकिल खान अय्युब खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस निरीक्षक हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी  राकेश जाधव व तहसीलदार मिलिंद वाघ  यांना माहिती दिली, गांजाची किंमत ६ लाख असून ,४ लाखाची चारचाकी व ५० हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तीनही आरोपीना अटक करण्यात आली आहे. तपास डिवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत. शकिल खान अय्युब खान हे कासोद्याच्या पंचायत समिती सदस्यांचे पती आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिस