शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पेन, पेन्सिलने होईल स्वसंरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:18 IST

येणाऱ्या प्रसंगावर कणखरपणे मात करून मुलींनी ताठ मानाने उभे रहावे, यासाठी पोलीस दलांतर्गत कार्यरत दामिनी पथक प्रयत्न करीत आहे. स्वत:जवळ असलेल्या पेन, पेन्सिल, बॅगद्वारे मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे, याचे धडे सोमवारी देण्यात आले.

ठळक मुद्दे‘दामिनी’चा पुढाकार : जालना शहरातील तीन शाळांमधील १२०० मुलींना दिले प्रशिक्षण

जालना : येणाऱ्या प्रसंगावर कणखरपणे मात करून मुलींनी ताठ मानाने उभे रहावे, यासाठी पोलीस दलांतर्गत कार्यरत दामिनी पथक प्रयत्न करीत आहे. स्वत:जवळ असलेल्या पेन, पेन्सिल, बॅगद्वारे मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे, याचे धडे सोमवारी देण्यात आले. शहरातील तीन शाळांमधील १२०० मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले.शालेय, महाविद्यालयीन मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यरत आहे. शाळा- महाविद्यालय, खासगी शिकवणीच्या वेळेत हे पथक शहरात गस्त घालत असून, टवाळखोरांना चोप देत आहे. मुलींनी केलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन कारवाई केली जात आहे.केवळ कारवाई करून थांबण्याऐवजी मुलींना कायद्याची माहिती व्हावी, मुलींनी स्वसंरक्षण करावे, यासाठीही या पथकाकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी शहरातील सेंट मेरी स्कूलच्या प्रांगणात १२०० मुलींना प्रशिक्षण देण्यात आले.कुडो फाऊंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पथकप्रमुख पोउपनि पल्लवी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित टीमने मुलींनी स्वत:जवळ असलेल्या पेन, पेन्सिल, शालेय बॅगेसह इतर शालेय साहित्याद्वारे स्वत:चे रक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले. सेंट मेरी स्कूलसह राष्ट्रीय हिन्दी विद्यालय, राष्ट्रीय इंग्रजी शाळेतील १२०० मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले.यावेळी दामिनी पथकातील पोकॉ एस. एम. खांडेभराड, ए. डी. साबळे, आर. एल. राठोड, यु. पी. साबळे, व्ही. एस. तायडे चंचल नोमालकर, राज नंदिनी चेके, धीरज गुप्ता, अजहर खान, सुमित भवर, रोहन सूर्यवंशी, गौरव आजगे, दत्ता पवार, निवृत्ती दिघे आदींची उपस्थिती होती.स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण गरजेचेस्पर्धेच्या युगात मुली शिक्षणात पुढे आहेत. त्याच प्रमाणे काळाची गरज ओळखून मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे आत्मसात करणे गरजेचे आहे.दामिनी पथकाकडून राबविण्यात येणारा उपक्रम चांगला असून, शाळा, महाविद्यालय स्तरावरूनही मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी यावेळी केले.

टॅग्स :JalanaजालनाPoliceपोलिसStudentविद्यार्थी