शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

"कोणाला विरोध नाही, ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी आंदोलन"; लक्ष्मण हाके अंबडमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 13:49 IST

आंदोलन स्थळ अंतरवाली सराटी की दुसरे? सर्वानुमते ठरणार

अंबड ( जालना) : कोणाच्या विरोधात नाही तर ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे, अशी भूमिका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आज, गुरुवारी सकाळी येथील ओबीसी समाज बांधवांच्या बैठकीत स्पष्ट केली. तसेच ओबीसीच पंचायतराजमधील आरक्षण या सरकारने धोक्यात आणले आहे. प्रस्थापितांकडून ओबीसी नेत्यांना लक्ष केलं जातं आहे. सरकारवर ओबीसी समाजाने दबाव वाढवावा लागेल, असे आवाहन देखील प्रा. हाके यांनी यावेळी केले.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. या उपोषणामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यातच ज्याठिकाणी जरांगे-पाटील उपोषणास बसले आहेत, त्याच गावात ओबीसी आरक्षण टिकविण्याच्या मागणीसाठी प्रा. लक्ष्मण हाके हे उपोषण करणार होते. तशी त्यांनी घोषणाही केली होती. दरम्यान, अंतरवली सराटीच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच बुधवारी रात्रीच हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतले पण वकिलांमुळे आपण सुटलो असे प्रा. हाके म्हणाले. त्यानंतर आज सकाळी प्रा. हाके यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात हजेरी लावली.  मेळाव्यात मार्गदर्शन करताना लक्ष्मण हाके म्हणाले, गावगाड्यातल्या छोट्या ओबीसी समाजामध्ये आपले आरक्षण जाणार याची भीती आहे, समाजाचे २९ टक्के आरक्षण वाचविण्यासाठी, समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आम्ही आंदोलन पुकारले, अशी भूमिका प्रा. हाके यांनी मांडली. तसेच ओबीसीचे हक्काचे आरक्षण वाचवा,  बारा बलुतेदार म्हणजे ओबीसी हे सांगण्यासाठी विचारवंत पुढे येत नाही. संसदेत या विषयावर बोलणारे नेते हवे आहेत, असेही प्रा. हाके म्हणाले. 

काहींनी व्यवस्था वेठीस धरली आरक्षणासाठी काही लोक व्यवस्था वेठीस धरत आहेत. सक्तीने आरक्षण आहे म्हणून तरी आपले काहीजण राजकारणात आहेत. तब्बल ४९२ जातींची बाजू मांडणारे नेते जातीयवादी कसे असू शकतात. सामाजिक न्यायासाठी ६० टक्के लोकसंख्येला केवळ ०.७ टक्के निधी मिळतो, अशी खंत देखील प्रा. हाके यांनी व्यक्त केली. 

आंदोलन स्थळ सर्वानुमते ठरणार यावेळी विविध भागातून आलेल्या समाज बांधवांनी मनोगत व्यक्त केले. तसेच आंदोलनाच्या विविध मुद्यांवर चर्चा करून आंदोलन स्थळ सर्वानुमते ठरविण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला. मेळाव्यात बळीराम खटके, रमेश वाघ,दीपक बोऱ्हाडे, संदीप खरात, रवींद्र खरात यांच्यासह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना