शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

१०५ वर्षांच्या स्थलांतरित महिलेची तरुण जीवनेच्छा

By admin | Updated: October 29, 2015 00:45 IST

सीरिया, इराक, अफगाणिस्तान तसेच उत्तर आफ्रिकेतील अशांतता आणि गरिबीमुळे लाखो लोकांनी शांततामय जीवनासाठी युरोपच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे

ओपॅटोवॅक (क्रोएशिया): सीरिया, इराक, अफगाणिस्तान तसेच उत्तर आफ्रिकेतील अशांतता आणि गरिबीमुळे लाखो लोकांनी शांततामय जीवनासाठी युरोपच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. लहान मुले, तरुण, नवविवाहित, मध्यमवयीन लोकांनी मातृभूमी सोडून परागंदा होण्याचा पर्याय नाइलाजाने स्वीकारला. या स्थलांतरितांमध्ये अफगाणिस्तानातील एक १०५ वर्षांच्या आजींचाही समावेश असल्याचे आढळून आले आहे. लहानसहान संकटामुळे जीवनाची आशा सोडणाऱ्या तरुणांची उदाहरणे डोळ्यांसमोर असताना या वयात अजूनही चांगल्या जीवनाच्या आशेने युरोपात २० दिवसांचा खडतर प्रवास करून आलेल्या या आजींचा प्रवास तितकाच रोमांचकारक आहे.बिबिहाल उझबेकी या अफगाणिस्तानातील कुडुंझ या गावातील १०५ वर्षांच्या आजी आहेत. तालिबानने नुकताच या शहरावर ताबा घेत पुन्हा शरिया कायदा लादला आहे. या सर्व परिस्थितीला कंटाळून बिबिहाल आजी आणि त्यांच्या १७ जणांच्या कुटुंबाने अफगाणिस्तान सोडून युरोपात जाण्याचा निर्णय घेतला. वयपरत्वे हालचालींवर मर्यादा आलेल्या असूनही बिबिहाल आजींनीही युरोपात जाण्याचा निश्चय केला. या २० दिवसांच्या खडतर प्रवासात त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ६७ वर्षांच्या मुलाच्या आणि १९ वर्षांच्या नातवाच्या पाठुंगळी बसून त्यांनी अखेर क्रोएशियात प्रवेश केला आहे. प्रवासाविषयी बोलताना बिबिहाल आजी फारसीतून सांगतात, माझे पाय फारच दुखतात, मी एक दोनदा खालीही पडले, त्याच्या खुणाही माझ्या डोक्यावर आहेत, पण मी जिद्द सोडली नाही. क्रोएशियामध्ये प्रवेश केल्यानंतर उझबेकी कुटुंबाची कागदपत्रे तपासण्यात आली. आता स्लोव्हेनिया आणि शेवटी स्वीडनला जाण्याची आमची इच्छा असल्याचे त्यांचा नातू मुहामदने सांगितले.