इराणवर हल्ल्याची तयारी, पण अमेरिकन सैनिकांची टॉयलेटसाठी रांगा, युद्धनौकेवर नेमकं काय घडलंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:09 IST2026-02-24T11:08:51+5:302026-02-24T11:09:56+5:30

USS Gerald R. Ford: इराणवर हल्ला करण्यासाठी भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या सर्वात प्रगत आणि महागड्या अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर एक गंभीर संकट ओढवले आहे.

USS Gerald R. Fords Vacuum System Failure: Thousands of US Sailors Struggle with Toilet Crisis Amid Iran Tensions | इराणवर हल्ल्याची तयारी, पण अमेरिकन सैनिकांची टॉयलेटसाठी रांगा, युद्धनौकेवर नेमकं काय घडलंय?

इराणवर हल्ल्याची तयारी, पण अमेरिकन सैनिकांची टॉयलेटसाठी रांगा, युद्धनौकेवर नेमकं काय घडलंय?

एकीकडे अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असून ट्रम्प प्रशासनाकडून युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे इराणवर हल्ला करण्यासाठी भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या अमेरिकेच्या सर्वात प्रगत आणि महागड्या अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर एक गंभीर संकट ओढवले आहे. यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड या जगातील सर्वात शक्तिशाली जहाजावरील सैनिकांना टॉयलेटसाठी भलीमोठी रांग लावण्याची वेळ आली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

अंदाजे १३ अब्ज डॉलर्स (सुमारे १.१८ लाख कोटी रुपये) खर्चून बांधलेल्या या जहाजावर ४,६०० लोकांची क्षमता आहे. मात्र, या जहाजातील व्हॅक्यूम कलेक्शन होल्डिंग अँड ट्रान्सफर' ही शौचप्रणाली वारंवार कोलमडत आहे. ही सिस्टिम क्रूझ जहाजांच्या धर्तीवर कमी पाणी वापरण्यासाठी बनवण्यात आली होती, परंतु युद्धनौकेच्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे त्यातील ६५० शौचालयांच्या अरुंद पाईप्समध्ये वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. एका लहान व्हॉल्व्हमधील बिघाडामुळे संपूर्ण झोनमधील शौचालये बंद पडत आहेत.

परिस्थिती इतकी बिकट आहे की, जहाजावरील ९० टक्के शौचालये अनेकदा निकामी असतात. यामुळे हजारो सैनिकांना शौचालयासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत असून, स्वतःची पाळी येण्यासाठी किमान ४५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागत आहे. ११ महिन्यांपासून समुद्रात तैनात असलेले हे सैनिक आधीच कुटुंबापासून दूर असल्याने मानसिक तणावात आहेत, त्यातच या समस्येमुळे त्यांच्या शारीरिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत.

अहवालानुसार, २०२५ मध्ये आतापर्यंत ३२ गंभीर तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत, तर एका चार दिवसांच्या कालावधीत तब्बल २०५ वेळा बिघाड झाल्याची नोंद आहे. अभियांत्रिकी पथक दिवसाला १९-१९ तास काम करून ही यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु समुद्रात असताना याची पूर्ण दुरुस्ती करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. यासाठी जहाजाला डॉकयार्डमध्ये परत नेणे आवश्यक आहे, जे सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत शक्य नाही.

जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकन नौदलाची या समस्येमुळे मोठी नाचक्की होत आहे. इराणसारख्या शत्रूशी दोन हात करण्यापूर्वी अमेरिकन सैनिकांना स्वतःच्याच जहाजावरील पायाभूत सुविधांशी झुंज द्यावी लागत आहे.

Web Title : अमेरिकी युद्धपोत में शौचालय संकट, ईरान पर हमले की तैयारी प्रभावित

Web Summary : अमेरिका-ईरान तनाव के बीच, यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड युद्धपोत शौचालय संकट से जूझ रहा है. दोषपूर्ण वैक्यूम प्रणाली से लंबी कतारें लग रही हैं, जिससे मनोबल और स्वास्थ्य प्रभावित हो रहा है. समुद्र में मरम्मत मुश्किल है, जिससे संचालन तत्परता बाधित हो रही है.

Web Title : US Warship's Toilet Troubles Hamper Iran Attack Readiness: Report

Web Summary : Amidst US-Iran tensions, the USS Gerald R. Ford warship faces a toilet crisis. Faulty vacuum system causes long queues, affecting morale and health. Repairs are difficult at sea, hindering operational readiness. Morale is down due to faulty facilities.