शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 08:08 IST

US Attack On Iran Nuclear Site: अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच आता या भागात असलेला प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन सैनिक आमच्या निशाण्यावर आहे, असा इशारा इराणने दिला आहे.

मागच्या आठ-दहा दिवसांपासून इस्राइल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेने थेट एंट्री करताना रात्री इराणमधील तीन प्रमुख अणुकेंद्रावर हल्ला केला. तसेच या हल्ल्यामध्ये इराणमधील फोर्डो या प्रमुख अणुकेंद्रासह नतांज आणि इस्फाहान या अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर इराणकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच आता या भागात असलेला प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन सैनिक आमच्या निशाण्यावर आहे, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून हा इशारा देण्यात आला आहे.

इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक बी२ बॉम्बर्स विमानांकडून हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच या हल्ल्यांसाठी शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर आता मध्य पूर्वेमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकन सैन्यदलांकडून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली. अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केले आहेत. हवाई दलाने इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बेचा वर्षाव केला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. 

टॅग्स :IranइराणUnited StatesअमेरिकाIsraelइस्रायलwarयुद्ध