शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

Video: भरपावसात 'जयभीम'चा नारा; अमेरिकेत बाबासाहेबांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 11:28 IST

अमेरिकेतील हा पुतळा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेर उभा करण्यात आलेला सर्वात उंच पुतळा आहे.

वॉशिंग्टन - भारतरत्न आणि संविधान निर्माते ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटी या नावाने १९ फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारत आणि अमेरिकन नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं यावेळी, उपस्थितांनी म्हटलं. विशेष म्हणजे भरपावसात पुतळा अनावरणासाठी नागरिकांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केलं. यासाठी अमेरिकेच्या विविध भागांतून ५०० हून अधिक भारतीय व अमेरिकन नागरिक उपस्थित होते. यावेळी जय भीमचा जयघोषही करण्यात आला.

अमेरिकेतील हा पुतळा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेर उभा करण्यात आलेला सर्वात उंच पुतळा आहे. भर पावसातही भारतीय नागरिक या कार्यक्रमासाठी उत्साहाने आले होते. काहीजण १० तासांचा प्रवास करुन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले. गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा बनवणाऱ्या प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांनीच हा पुतळा बनवला आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर द्वारा स्टॅच्यू ऑफ इक्वलिटीची स्थापना मॅरिलँडच्या एक्कोकीक (Accokeek) येथील १३ एकर जागेवर करण्यात आली आहे. येथील उद्यानास बी. आर.आंबेडकर स्मृति पार्क असं नावही देण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी भारतासह संयुक्त राज्य अमेरिकेतील नामवंत पाहुणे उपस्थित होते. अमेरिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जात असल्याने आजचा क्षण १४० कोटी भारतीय आणि ४५ लाख अमेरिकन भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं दिलीप म्हस्के यांनी म्हटलं. तसेच, हा पुतळा या सर्व भारतीयांचं प्रतिनिधित्व करत आहे, असेही ते म्हणाले. दिलीप म्हस्के हे अमेरिकेतील आंबेडकरवादी आंदोलनाचे नेतृत्व करतात. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAmericaअमेरिकाmarathiमराठी