इराणंच्या ‘या’ शस्त्रानं वाढवलीय अमेरिकेची डोकेदुखी, ठरतेच ड्रोनचा काळ, महाशक्तीकडे काहीच नाही उपाय  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:48 IST2026-03-14T17:44:32+5:302026-03-14T17:48:16+5:30

Iran War: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाने गंभीर रूप धारण केलं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू असल्याने हे युद्ध थांबण्याचे कुठलेही संकेत मिळत नाही आहेत. या दरम्यान, इराणने हल्लीच एका शक्तिशाली शस्त्राचं परीक्षण केलं आहे.

Iran's 'this' weapon has increased America's headache, the era of drones is coming, the superpower has no solution | इराणंच्या ‘या’ शस्त्रानं वाढवलीय अमेरिकेची डोकेदुखी, ठरतेच ड्रोनचा काळ, महाशक्तीकडे काहीच नाही उपाय  

इराणंच्या ‘या’ शस्त्रानं वाढवलीय अमेरिकेची डोकेदुखी, ठरतेच ड्रोनचा काळ, महाशक्तीकडे काहीच नाही उपाय  

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाने गंभीर रूप धारण केलं आहे. दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू असल्याने हे युद्ध थांबण्याचे कुठलेही संकेत मिळत नाही आहेत. या दरम्यान, इराणने हल्लीच ३५९ या नव्या शस्त्राचं परीक्षण केलं आहे. ही जुन्या ३५८ क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र रडारचा वापर न करता शत्रूच्या ड्रोनचा मागोवा घेऊन त्याला नष्ट करू शकते. युद्धाला सुरुवात झाल्यापासून ३५८ क्षेपणास्त्र  अनेक अमेरिकन एमक्यू-९ रीपर आणि इस्राइली हर्मीस ९०० ड्रोन पाडले आहेत. आता ३५९ क्षेपणास्त्र आल्याने अमेरिकेचे आखाती देशांमधील सर्व ड्रोन संकटात सापडले आहेत. तसेच या क्षेपणास्त्राला रोखण्यासाठीचा कुठलाही उपाय सध्या अमेरिकेकडे नाही आहे.

३५८ हे क्षेपणास्त्र एक जेट-पावर्ड लॉयटरिंग इंटरसेप्टर आहेत. ते ट्रकवरून लॉन्च करता येतं. हे आकाशात फिरत राहते आणि लक्ष्य शोधते. हे क्षेपणास्त्र कुठलेही रडार सिग्नल पाठवत नाही. त्यामुळे ड्रोन ऑपरेटरला त्यांचा माग लागत नाही. आता ३५८ च्या तुलनेत ३५९ अधिक मोठं आणि अद्ययावत आहे. याचं एअरफ्रेम मोठं आहे. तसेच ते अधिक वेळ आकाशात राहू शकतं. तसेच मोठा टप्पा गाठू शकतं. त्याचा टर्मिनल स्पीड अधिक आहे. त्यामुळे वाचणं कठीण असतं. याची उंची गाठण्याची क्षमता आणि घातकता वाढली आहे. तसेच हे क्षेपणास्त्रसुद्धा रडार सायलेंट आहे आणि ऑटोनॉमस हंटिंग करते.

इराण हे क्षेपणास्त्र मोबाईल ट्रक लॉन्चरवरून  मोठ्या प्रमाणावर लॉन्च करू शकतो. प्रत्येक क्षेपणास्त्र आपला किल झोन बनून फिरत राहते. त्यामुळे इराणच्या पूर्ण एअरोस्पेसमध्ये ऑटोनॉमस अँटी ड्रोन नेटवर्क तयार होते. तसेच त्याचा कुठलाही सेंट्रलाईज रडार नसतो.

सध्याच्या इराण युद्धात अमेरिकेचं हवाई वर्चस्व हे ड्रोनवर अवलंबून आहे. त्यात एमक्यू-९ रीपर आयएसआरचा इंटेलिजेन्स, सर्व्हिलान्स, रिकॉनिसेन्ससाठी वापर होतो. मात्र ३५८ आणि ३५९ सारखी शस्त्रे ड्रोनला सहजपणे मारू शकतात. ऑपरेटरला कुठलीही वॉर्निंग मिळत नाही. मागच्या ११ दिवसांमध्ये या क्षेपणास्त्रांनी अनेक एमक्यू-९ आणि हर्मिस ९०० पाडले आहेत. या युद्धात इराण आपल्या स्वस्तातल्या हत्यारांच्या मदतीने महागड्या ड्रोनना नष्ट करत आहे. त्यामुळे अमेरिकेची हवाई टेहेळणी कमकुवत होत आहे. तसेच ही क्षेपणास्त्रे रडारचा वापर करत नसल्याने याला प्रत्युत्तर देण्यासाठी सध्यातरी अमेरिकेकडे कुठलीही उपाययोजना नाही आहे.  

Web Title : ईरान के हथियार से बढ़ी अमेरिकी चिंता, ड्रोन युग खत्म, कोई समाधान नहीं।

Web Summary : ईरान की नई 359 मिसाइल, 358 का उन्नत संस्करण, रडार के बिना ड्रोन को निशाना बनाती है, जिससे अमेरिकी हवाई वर्चस्व को चुनौती मिलती है। इसने अमेरिकी एमक्यू-9 रीपर और इजरायली हर्मीस 900 ड्रोन को मार गिराया। अमेरिका के पास कोई जवाबी उपाय नहीं है, जिससे खाड़ी में उसकी हवाई निगरानी कमजोर हो रही है।

Web Title : Iran's weapon increases US woes, drone era ends, no solution.

Web Summary : Iran's new 359 missile, an upgrade to the 358, targets drones without radar, challenging US air dominance. It downed American MQ-9 Reapers and Israeli Hermes 900 drones. America lacks countermeasures, weakening its aerial surveillance in the Gulf.