Iran War: "काय करायचं, हे आता आम्ही ट्रम्प यांना विचारायचं का?", नेतन्याहू इराणवरील हल्ल्यानंतर काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 09:34 IST2026-03-20T09:31:53+5:302026-03-20T09:34:31+5:30

इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर इस्रायलने हल्ला केला. भूगर्भात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक साउथ पार्स ठिकाण आहे, त्यालाच इस्रायलने लक्ष्य केले. 

Iran War: "Should we ask Trump what to do now?", What did Netanyahu say after the attack on Iran? | Iran War: "काय करायचं, हे आता आम्ही ट्रम्प यांना विचारायचं का?", नेतन्याहू इराणवरील हल्ल्यानंतर काय बोलले?

Iran War: "काय करायचं, हे आता आम्ही ट्रम्प यांना विचारायचं का?", नेतन्याहू इराणवरील हल्ल्यानंतर काय बोलले?

इस्रायलनेच अमेरिकेला इराण विरूद्धच्या युद्धात ओढले, अशी चर्चा संघर्ष सुरू झाल्यापासून होत आहे. याबद्दल बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. आम्ही अमेरिकेला या युद्धात जबरदस्ती ओढलेले नाही, असे ते म्हणाले. 

इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नेतन्याहू म्हणाले की, "खरंच कुणाच्या मनात असा विचार येईल का की आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारू की, काय करायला हवे?"

इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना आधी दिली गेली होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर नेतन्याहू म्हणाले की, 'इस्रायलने एकट्याने ही कारवाई केली आहे. ट्रम्प यांनी आम्हाला यापुढे हल्ले करण्यापासून रोखले आहे आणि आम्ही तसेच करत आहोत.'

ट्रम्प यांनीही चर्चा फेटाळली

२८ फेब्रुवारी रोजी इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाची ठिणगी पडली. याच दिवशी इस्रायल-अमेरिकेने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई मारले गेले. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अणुऊर्जा कार्यक्रमाबद्दल चर्चा सुरू होती. त्याच काळात अचानक इस्रायल, अमेरिकेने युद्ध सुरू केले.

अमेरिकेनेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही असा प्रश्न विचारला गेला होता की, अमेरिकेला इस्रायलने बळजबरी युद्धात ओढले. त्यावर त्यांनी नकार दिला. ते सातत्याने असे काही झाले नसल्याचेच म्हणत आहे. 

"कदाचित असेही झाले असावे की, मी त्यांना (इस्रायल) युद्धात सामील होण्यासाठी मजबूर केले. बघा, आम्ही मुर्खांसोबत (इराण) चर्चा करत होतो, आणि माझे असे मत आहे की, ते (इराण) आधी हल्ला करणार होते", असे ट्रम्प व्हाईट हाउसमध्ये मार्चच्या सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. 

केंट यांच्या राजीनाम्याने अमेरिकेच्या भूमिकेवर शंका

अमेरिकेमध्ये या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे की, अमेरिका या युद्धात का सामील झाली आहे आणि यात इस्रायलची भूमिका काय आहे? अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चेला वेग आला आहे.

केंट यांनी ट्रम्प यांना दिलेल्या राजीनाम्यामध्येच हे स्पष्ट आहे की आम्ही (अमेरिका) इस्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली लोकांच्या लॉबीने टाकलेल्या दबावामुळे सुरू केले आहे. त्यांनी एका मुलाखतीतही सांगितले की, इस्रायलने युद्धाचा निर्णय समोर मांडला. इस्रायली अधिकारी सर्व प्रक्रिया बाजूला सारून अमेरिकेच्या खासदारांचे युद्धासाठी मत परिवर्तन करत होते. 

Web Title : नेतन्याहू का खंडन: ईरान युद्ध में अमेरिका को खींचा नहीं गया।

Web Summary : ईरान के गैस क्षेत्र पर हमले के बाद नेतन्याहू ने अमेरिका को युद्ध में धकेलने से इनकार किया। उन्होंने कहा कि इजरायल ने अकेले कार्रवाई की, भले ही ट्रम्प ने रोक का आदेश दिया था। अमेरिका की भागीदारी और इजरायल की लॉबिंग पर विवाद है।

Web Title : Netanyahu denies dragging US into Iran war after attack.

Web Summary : Following an attack on Iran's gas field, Netanyahu denied forcing the US into war. He stated Israel acted alone, despite Trump's halt order. Controversy surrounds US involvement and Israel's lobbying efforts, highlighted by a resignation amid the conflict.