आता इराणनं जागे केले 'झोपलेले शिकारी'! अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा; 'तो' एन्क्रिप्टेड मेसेज नेमका काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:32 IST2026-03-10T12:31:21+5:302026-03-10T12:32:18+5:30
लष्करी पातळीवर इस्रायलने सोमवारी इराणच्या मध्यवर्ती भागावर आणि बैरूतमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर जोरदार हल्ले चढवले. यापूर्वी इस्रायलने तेहरानमधील ऑईल डेपो उडवून दिला होता. याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे इस्रायलसह मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ले केले जात आहेत.

आता इराणनं जागे केले 'झोपलेले शिकारी'! अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा; 'तो' एन्क्रिप्टेड मेसेज नेमका काय?
गेल्या अकरा दिवसांपासून इराण आणि इस्रायल-अमेरिकाय यांच्या तुंबळ युद्ध सुरू आहे. ही परिस्थिती आणखी स्फोटक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतरही हे युद्ध थांबलेले नाही. उलट आता, एका ताज्या रिपोर्टनुसार, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने एका विशिष्ट सिग्नलद्वारे आपल्या जगभरातील 'स्लीपर सेल्स'ना सक्रिय केल्याचा दावा केला जात आहे.
गोपोनीय संदेशात नेमकं काय? -
एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, इराणमधून पाठवण्यात आलेला एक 'एन्क्रिप्टेड' मेसेज अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात खामेनेई यांचा मृत्यू झाला. यानंतर, लगेचच हा मेसेज पाठवण्यात आला. प्राथमिक सिग्नल विश्लेषणानुसार, हा संदेश इराणमधून आला होता, असे फेडरल अलर्टमध्ये म्हणण्यात आले आहे.
गुप्तचर संस्था किंवा दहशतवादी गटांकडून, असे संदेश अनेक वेळा पाठवले जातात -
हा मेसेज अनेक देशांमध्ये पुन्हा प्रसारित करण्यात आला, हे असामान्य आहे. संदेश पूर्णपणे एन्क्रिप्टेड होता आणि केवळ 'डिक्रिप्शन की' असलेल्यां लोकांनाच तो वाचणे शक्य आहे. इंटरनेट अथवा मोबाइल नेटवर्कचा कोणताही ट्रेस लपविण्यासाठी गुप्तचर संस्था किंवा दहशतवादी गटांकडून, असे संदेश अनेक वेळा पाठवले जातात.
दरम्यान, अलर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, "हे ट्रान्समिशन बाह्य स्लीपर अॅसेट्सना सक्रिय करण्यासाठी किंवा सूचना देण्यासाठी पाठवले गेले असण्याची शक्यता आहे. मात्र हा संदेश नेमका काय हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, नवीन स्टेशनद्वारे अचानकपणे आंतरराष्ट्रीय पुनर्प्रसारण होणे ही चिंतेची बाब आहे." मात्र, एखाद्या विशिष्ट ठिकाणी अद्यापतरी धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही.
इस्रायलकडून इराणच्या मध्यवर्ती भागावर आणि बैरूतमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर जोरदार हल्ले -